मोचेमाड स्मशानभूमीतील टॉवरच्या साहित्याची चोरी
४ लाखाचे साहित्य चोरले ; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
वेंगुर्ले (वार्ताहर)-
मोचेमाड येथील स्मशानभूमीत सध्या काम चालू असलेल्या टॉवरचे सुमारे चार लाख किंमतीचे साहित्य अज्ञाताने 24 डिसेंबर रोजी रात्री 12.15 वाजण्याच्या पूर्वी चोरून नेल्याची तक्रार वेंगुर्ले पोलिसात दाखल झाली असून अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोचेमाड ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक स्मशानभूमीत पेस डिजिटेक कंपनीच्या कोल्हापूर येथून टॉवरच्या कामकाजासाठी आवश्यक असणारे रुपये 3,93,823 रुपयांचे सामान कोणीतरी अज्ञात चोरट्याने दि. 25 डिसेंबर लबाडीच्या इराद्याने चोरून नेलेले आहे. या संदर्भात वेंगुर्ले नवाबाग येथे राहणारे सांगली हिंगणगाव बुद्रुकचे मूळ रहिवासी धनाजी भिकू कदम (38) यांनी वेंगुर्ले पोलिसात आज बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहिता 303 (2) नुसार चोरीचा गुन्हा अज्ञात चोरट्यावर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल रूपा वेंगुर्लेकर या करीत आहेत.