For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षिका अर्चना सावंत यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर

06:01 PM Dec 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शिक्षिका अर्चना सावंत यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयच्या इंग्रजी विषय शिक्षिका सौ अर्चना सावंत यांना हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या 27 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता देवगड जामसंडे येथे. कै सौ सरस्वतीबाई नलावडे हायस्कूलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी. श्री गणपती कमळकर ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख., माजी आमदार. एडवोकेट अजित गोगटे,जि प उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे,पोलीस निरीक्षक अरुण देवकर ,प्रसाद मोंडकर ,. सुरेश नांदिवडेकर. ,गटविकास अधिकारीवृषाली यादव. ,डॉक्टर मिलिंद कुलकर्णी , रुझारिओ पिंटो आधी उपस्थित राहणार आहेत. सौ सावंत या गेली 25 वर्ष विनाअनुदानित तत्त्वावरील शाळेत इंग्रजी विषय शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत विनाअनुदानित तत्वावरील शाळेत काम केले आहे. सध्या टप्पा अनुदान तत्त्वावर काम करत आहेत.एम ए ,बी एड पदवी प्राप्त असून कायदेविषयक ज्ञान त्यांनी घेतले आहे. वकिलीक्षेत्राची पदवी परीक्षा त्या उत्तीर्ण आहेत. मराठी एम ए शिक्षण ही पूर्ण केले आहे. त्यांच्या एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या संस्थेमार्फत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचीही निवड करण्यात आली आहे . शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.