मोटरसायकल व घरफोडी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस; गांधीनगर पोलीस कारवाई
उचगाव / वार्ताहर
गांधीनगर पोलिसांनी मोटर सायकल व घरफोडी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असुन याप्रकरणी दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली आहे.त्यांच्याकडून हिरो स्प्लेंडर मोटर सायकल किंमत अंदाजे पस्तीस हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केली.ही धडक कारवाई गांधीनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकांने केली.
मोटारसायकल चोरीची फिर्याद सतिश विलास पांचगे, वय ४२ रा.साईनाथ कॉलनी, मणेरमळा उचगाव ता.करवीर यांनी गांधीनगर पोलिसांत दिली होती.याप्रकरणी सौरभ पांडूरंग गोंधळी, वय २३, रा. टेंबलाईवाडी हनुमान कॉलनी ता.करवीर व शुभम प्रभाकर कबाडे वय २३, रा. महापूर चौक टेंबलाईवाडी, ता. करवीर या दोघां चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की , फिर्यादी यांचे मणेरमळा उचगाव येथील घराचे दारात पार्क केलेली काळया रंगाची हिरो स्प्लेंडर मोटर सायकल ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची घटना दि.१२ आक्टोंबर रोजी घडली होती.
गांधीनगर पोलीस ठाण्याचे यांनी पथक तयार करून चोरीस गेलेल्या मोटर सायकल व अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी जलद तपास सुरू केला.यावेळी मोटर सायकल चोरीचे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत असताना उचगाव ब्रिज येथील रिक्षा स्टॉप येथून दोन संशयित आरोपी यांना ताब्यात घेवून चौकशी केली.यावेळी दोघां चोरट्यांकडून स्प्लेंडर मोटर सायकल हस्तगत केली. अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता गडमुडशिंगी येथील एम.एस.सी. बी ऑफिस हॉट लाईन युनिट येथे चोरी करणेचा प्रयत्न केला असलेची कबुली चोरट्यांनी दिली. पाच दिवसांत गांधीनगर पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केलेने जनतेतून कौतुक होत आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील करीत आहेत.