महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

12:30 PM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्हापसा येथील नास्नोडकर ज्वेलर्समध्ये चोरी : वीज खांबावरून छप्परातून दुकानात प्रवेश

Advertisement

म्हापसा : म्हापसा बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नास्नोडकर ज्वेलर्सच्या दुकानातून रविवार 22 सप्टेंबर रोजी रात्री 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान तिघा बुरखाधारी चोरट्यांनी सुमारे तीन कोटीच्यावर किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याबाबत अद्याप कुणालाही अटक झालेली नसली तरी तिघे बुरखाधारी चोरटे सीसी टिव्हीत कैद झालेले आहेत.

Advertisement

याबाबत सविस्तर माहिती अशी की चोरट्यांनी दुकानाच्या बाजूलाच असलेल्या वीज खांबावरून दुकानाच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. दुकानात डिस्प्लेसाठी ठेवण्यात आलेले कोट्यावधी ऊपयांचे दागिने चोरून नेले. दागिन्यांची किंमत अंदाजे 3 कोटीच्यावर असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत नेमका आकडा मालक चंद्रमोहन नास्नोडकर यांनी पोलिसाना दिलेला नाही.

रविवारी दररोजच्याप्रमाणे रात्री 8 वाजता नास्नोडकर आपले दुकान बंद करून गेले होते. सोमवारी सकाळी 10 वाजता दुकान उघडले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. सकाळी दुकान उघडताच डिस्प्लेसाठी ठेवण्यात आलेले सर्व दागिने गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. ते पहिल्या मजल्यावर गेले असता चोरट्यांनी तेथील ग्रील्स तोडून आतमध्ये प्रवेश केल्याचे समजले. विशेष म्हणजे चोरट्यांनी लोखंड न कापता सिमेंट खोदून काढले आणि आतमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले, असे ते म्हणाले.

तिघे बुरखाधारी चोरटे कॅमेरात कैद

तिघा चोरट्यांनी आपल्या तोंडावर बुरखा बांधला होता, मात्र काहीवेळ त्यांनी तो बुरखा काढल्याने त्यांचे चेहरे कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज जप्त केली आहे. दुकानावरील गडगंज लोखंडी गेट चोरट्यांनी कटावणी, हातोडीच्या सहाय्याने तोडली आहे. सर्व दागिने सेफमध्ये होत नसल्याकारणाने ते बाहेर ठेवण्यात आले होते, ते सर्व दागिने चोरट्यांनी चोरून नेले, असे नास्नोडकर म्हणाले.

नास्नोडकर यांच्या ज्वेलरी दुकानात चोरी झाली आहे. त्या दुकानापासून अवघ्या 100 मीटरवर चतुर्थीपूर्वी बंदुकधारी सहाय्यक कक्ष गोवा ज्वेलर्स असोसिएशनतर्फे म्हापसा पोलिसांना पुरस्कृत करण्यात आला होता. त्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्या कक्षापासून जवळच ही चोरी झाल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजारपेठेत प्रत्येकी 2 तासानंतर पोलीस तैनात असेल असे सूचित करण्यात आले होते. मात्र येथे या कक्षात बंदुकधारी पोलीसच उपलब्ध नसतो असे आढळून आले आहे. गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतरकर यांच्याशी तऊण भारतने संपर्क साधला असता त्यांनी या चोरीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सराफी दुकानांच्या संरक्षणाबाबत मंगळवारी आम्ही उपअधीक्षक व निरीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती कुडतरकर यांनी दिली.

म्हापसा बाजारपेठेत रात्रीच्यावेळी गस्त वाढवा अशा आशयाची लेखी पत्रे तसेच म्हापसा बाजारपेठेत सीसीटिव्ही कॅमेरा बसवा अशी लेखी पत्रे आम्ही म्हापसा व्यापारी संघटनेने अनेकवेळा पोलीस अधिकारीवर्ग व म्हापसा नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाऱ्यांना लेखी दिले व याबाबत चर्चाही केली. मात्र आश्वासनाशिवाय आम्हाला काहीच मिळाले नाही, अशी माहिती म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी दिली. या चोरीबाबत म्हापसा पोलिसांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी सर्वत्र शोधाशोध सुरू केली आहे. सकाळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. बार्देश तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी वर्ग एलआयबी पथकांना बोलावून घेऊन त्यांना वेगवेगळ्या सूचना केल्या. काही ठिकाणी चौकशीसाठी पोलीस पथकही पाठविण्यात आले आहे. म्हापसा पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article