भोसेतील यल्लमादेवी मंदिरात चोरी! अर्धा तोळे दागिने व दानपेटीतील रोकड लंपास
अज्ञात चोरट्यांवर गुन्हा
मिरज प्रतिनिधी
तालुक्यातील भोसे येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालत असलेल्या प्रसिध्द यल्लमादेवी मंदिरात गुरूवारी रात्रीनंतर चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोखंडी ग्रील तोडून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या अंगावरील अर्धा तोळे सोन्याचे दागिने आणि दान पेटीतील सातशे ऊपयांची रोख रक्कम असा सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल चोऊन नेला. याप्रकरणी मंदिराचे पुजारी बाळू नारायण नलवडे (65) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.
भोसे येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत खालील बाजूस यल्लमादेवी मंदिर आहे. गुरूवारी रात्री नऊ वाजता मंदिराच्या पुजाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मंदिर बंद केले होते. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सदर मंदिरात शिऊन मुख्य गाभाऱ्याचे लोखंडी ग्रील कटरच्या सहाय्याने तोडले. त्यानंतर लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. देवीच्या अंगावरील सुमारे अर्धातोळे सोन्याचे दागिने आणि देवीसमोर ठेवलेली दान पेटी फोडून त्यातील सुमारे सातशे ऊपयांची रक्कम असा 40 हजारांचा ऐवज चोऊन नेला.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजता मंदिर उघडण्यासाठी पुजारी आले असता, त्यांना गाभाऱ्याचा दरवाजा तुटल्याचा दिसला. त्यांनी आत जावून पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी अन्य ऐवज शोधण्यासाठी काही साहित्यही विस्कटले होते. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला. श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. मंदिर फोडणारे चोरटे स्थानिकच असल्याचा संशय असून, तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, भोसे गावात अलीकडील काही वर्षांमध्ये सलग दुसऱ्यांदा मंदिर फोडल्याची घटना घडली आहे. काही वर्षापूर्वी भोसे गावातील गवरवाडीतील एक मंदिर अशाप्रकारे फोडण्यात आले होते. आता यल्लमादेवी मंदिरात चोरी झाली. जुना रस्ता असताना मंदिर रस्त्याकडेला वरील बाजूस होते. मात्र, नव्याने झालेल्या महामार्गामुळे मंदिर खाली व रस्ता वऊन गेला आहे. रात्रीनंतर मंदिर परिसरात अंधार असतो. शिवाय महामार्गावरील वेगवान वाहनांमुळे परिसर निर्मनुष्य असतो. याचीच संधी साधून चोरट्यांनी मंदिर फोडून चोरी केली आहे. सदर चोरट्यांना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी भाविकांतून होत आहे.