महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गांधीनगर येथील भांडी कारखान्यात चोरी

06:58 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

30 लाखांची अॅल्युमिनियम, तांब्याची भांडी पळविली

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. जुने गांधीनगर येथील हरिकाका कंपाऊंड परिसरात असलेल्या एका कारखान्यात चोरी झाली असून चोरट्यांनी सुमारे 30 लाख रुपयांहून अधिक किमतीची अॅल्युमिनियम व तांब्याची भांडी पळविली आहेत. शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.

अभी मेटल इंडस्ट्रीज या कारखाना व गोदामात चोरी झाली आहे. यासंबंधी देव जोशी यांनी शनिवारी सायंकाळी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

शुक्रवारी मध्यरात्री 2.30 नंतर चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी कारखान्याची कडी तोडून अॅल्युमिनियम व तांब्याची भांडी, प्लास्टिक कच्चामाल असा सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर माळमारुती पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या या कारखान्यामधून नेमकी किती टन भांडी पळविण्यात आली, याचा तपशील मिळविण्याचे काम सुरू आहे. स्टॉक तपासल्यानंतरच यासंबंधीची माहिती मिळणार आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी एखाद्या ट्रकमधून भांडी पळविल्याचा संशय आहे.

कारखाना मालकांनी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वायर कापण्यात आली आहे. चोरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊन याची चोरट्यांनी पुरेपूर काळजी घेतली असून यामुळे या परिसरातील इतर आस्थापनांसमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरट्यांची छबी कैद झाली आहे का? याची तपासणी करण्यात येत आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

चार महिन्यांतील दुसरा प्रकार

चार महिन्यांपूर्वी याच कारखान्यात चोरीची घटना घडली होती. या प्रकरणाचा अद्याप तपास लागला नाही, तोच दुसऱ्यांदा चोरी झाली आहे. फेब्रुवारीमध्ये चोरट्यांनी कारखाना-गोदाम फोडले होते, असे देव जोशी यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना जोडलेले वायर कापण्याबरोबरच त्याचा डीव्हीआरही चोरट्यांनी पळविला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article