तिगडी येथील हिरेमठात चोरी
तीस किलो चांदीचे दागिने, मूर्ती लांबविली : घटनेने गावात खळबळ
वार्ताहर/बाळेकुंद्री
बेळगाव व बैलहौगल-सौंदत्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बैलहोंगल तालुक्यातील तिगडी येथील हिरेमठाचे श्री शिवबसप्पा अज्जनवर मठात (गदगी अज्ज मठ) शनिवारी रात्री चोरट्यांनी 16 लाखाहून अधिक किमतीचे सुमारे तीस किलोहून अधिक चांदीचे दागिने व इतर वस्तू लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास मंदिरा शेजारी सुतार बंधूच्या महिला झाडेलोट करत असताना मंदिराला लावलेला कुलूप तोडलेल्या अवस्थेत पडल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिराला लागूनच आजूबाजूला मठात पूजा करण्याऱ्यांची घरे तसेच मठासमोर पुंभार वसाहत व शेतकऱ्यांची घरे असतानादेखील येथे घडलेल्या या चोरीमुळे गावात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री पुंभार वसाहातसमोर असलेल्या समोरील मठातील बंद असलेल्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांनी पुढील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर श्री शिवबसप्पा अज्जनवर मठात मूर्तीवर घातलेला चांदीचा मुखवटा, चांदीचा हार, चांदीची गणेशमूर्ती, चांदीचा नंदीसह अनेक ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार मठाचे स्वामींनी बैलहौगल पोलीस ठाण्यात दिली आहे.