महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकणातील युवाईने लाल मातीतच करावं अपेक्षित करिअर - जयू भाटकर

11:24 AM Dec 20, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी पत्रकार संघातर्फे माध्यम सल्लागार जयू भाटकर यांचा सन्मान

Advertisement

सावंतवाडी (प्रतिनिधी)

Advertisement

कोकणातील मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता आहे. मात्र मुंबईसारख्या महानगरी आणि तेथील चंदेरी दुनियाचे आकर्षण त्यांना अधिक असल्यामुळे त्यांचे कौशल्य आणि श्रम याचा वापर मूठभर उद्योजक मंडळींना होत आहे. यापुढे मुंबईसारख्या महानगरीत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे स्वतःचं स्थान बळकट करणाऱ्या, कौशल्यधिष्ठित युवकांनी आपल्या गावाची कास धरावी. त्यांनी आपल्या कोकणात येऊन स्वतःच्या गावाचा आणि पर्यायाने येथील पर्यटन व्यवसायाचा विकास करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ निर्माता, दिग्दर्शक तथा दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी येथे व्यक्त केले.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जयू भाटकर यांचा सस्नेह सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री भाटकर संबोधित करीत होते.या कार्यक्रमास सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, विजय देसाई, राजू तावडे, रुपेश हिराप, प्रा. रुपेश पाटील,आनंद धोंड, शैलेश मयेकर, भगवान शेलटे, नरेंद्र देशपांडे, प्रसन्ना गोंदावळे, भुवन नाईक, नितेश देसाई यांची उपस्थिती लाभली.

दरम्यान आपल्या मनसोक्त गप्पांनी भाटकर यांनी कोकणच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता या सर्वच अंगांना स्पर्श करीत दिलखुलास गप्पा केल्या.यादरम्यान ते म्हणाले कोकणची माती ही रत्नांची खाण आहे. इथल्या रत्नांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकिक कमावलेला आहे. मराठी रंगभूमी आणि मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम इथल्या साहित्यिक आणि कलावंत मंडळींनी केलेले आहे. मुंबई दूरदर्शनवर काम करत असताना कोकणच्या मातीतला सुगंध नेहमीच जोपासला. त्यामुळेच मुंबईसारख्या मोठ्या शहरात मला कधीच कोणी स्पर्धक वाटलं नाही. कारण आपली स्पर्धा स्वतःशी असावी, इतरांना आपले स्पर्धक समजून आपण आपले स्थान कमी करू नये, असेही आवाहन श्री. भाटकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी तर आभार सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी मानले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # jayu bhatkar # sawantwadi # tarun bharat news #
Next Article