For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईलवर बोलण्याच्या नादात युवक विहिरीत कोसळला

10:21 AM Feb 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोबाईलवर बोलण्याच्या नादात युवक विहिरीत कोसळला
Advertisement

फोंडा : विहिरीच्या कठड्यावर बसून मोबाईलवर बोलणाऱ्या युवकाच्या हातातील मोबाईल संच अचानकपणे निसटला व तो पकडण्याच्या प्रयत्नात सदर युवक थेट विहिरीत कोसळला. सुदैवाने विहिरीत पुरेशे पाणी असल्याने व अग्निशामक दलाचे पथक वेळीच मदतीला धावल्याने जीवावर आलेल्या संकटातून त्याची सुरक्षीतपणे सुटका झाली. दाग, फोंडा येथे गुऊवारी सायंकाळी ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार गोविंद कश्यप हा 24 वर्षीय युवक दाग येथील श्री सरस्वती मंदिरच्या पाठिमागे असलेल्या विहिरीच्या कठड्यावर बसून मोबाईवर बोलत होता. तेथील एका घरात भाडेकऊ म्हणून तो राहत आहे. बोलण्यात गुंग झालेल्या या युवकाच्या हातातील मोबाईल संच अचानकपणे निसटला. आपला मोबाईल संच आता विहिरीत पडणार याची जाणिव होताच, बेभान अवस्थेत त्याने तो पकडण्याचा प्रयत्न केला, आणि तोल जाऊन तो थेट विहिरीत कोसळला. साधारण दहा मिटर खोल असलेल्या या विहिरीत तीन ते चार फुट पाणी असल्याने त्याला विशेष दुखापत झाली नाही. त्याचा आरडा ओरडा ऐकून आसपास असलेले लोक विहिरीजवळ धावले. मदतीसाठी तात्काळ फोंडा अग्निशामक दलाशी संपर्क साधण्यात आला. सायंकाळी फोंडा शहरात वाहनांची वर्दळ असतानाही अग्निशामक दलाचे पथक काही वेळातच घटनास्थळी पोचले व त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. या प्रसंगामुळे जीवावर आलेल्या संकटातून त्याची सुटका झाली खरी, पण देहभान विसऊन मोबाईलच्या आहारी गेल्याने काय होऊ शकते याचा त्याला धडाही मिळाला. फायर फायटर मन ठाकूर व अन्य जवानांनी विहिरीत पडलेल्या या युवकाला शिडीच्या मदतीने वर काढण्यात विशेष कामगिरी बजावली.

Advertisement

Advertisement
Tags :

.