For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतली संस्कृतमधून शपथ

01:00 PM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतली संस्कृतमधून शपथ
Advertisement

पणजी : उत्तर गोवा खासदार आणि केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी नवी दिल्लीत लोकसभेत झालेल्या संसद सदस्यत्वाच्या शपथग्रहणाच्यावेळी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. दक्षिण गोवा मतदारसंघातून प्रथमच विजयी झालेल्या विरियातो फर्नांडिस यांनी मात्र कोकणी भाषेतून शपथ घेतली. नाईक हे भाजप उमेदवारीवर सलग सहा वेळा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांचा पराभव केला आहे. दक्षिण गोव्यात भाजपच्या प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या पल्लवी धेंपे यांना काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी पराभूत केले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.