पूर्ववैमनस्यातून युवकाच्या डोक्यात हत्याराने वार! तिघांवर गुन्हा दाखल
लाथाबुक्क्यांनी मारहाण
सांगली प्रतिनिधी
पूर्ववैमनस्यातून तिघांनी एका युवकास बेदम मारहाण केली त्याबरोबरच या हलेखोरांनी त्याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार केल्याने युवक गंभीर जखमी झाला. हा हल्ला शुक्रवार 27 रोजी झुलेलाल चौक ते शंभर फुटी रस्ता या परिसरात रात्री नऊच्या सुमारास घडला. यामध्ये सौरभ अशोक यादव (वय 20, रा. गजानन कॉलनी, शामरावनगर, सांगली) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अजय अष्टेकर, आ†भ पवार आणि एका अनोळखी युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संशयित आणि फिर्यादी सौरभ यादव यांचा जुना वाद होता. 27 रोजी रात्री नऊच्या सुमारास संशयितांनी दुचाकीवऊन येवून रस्त्यावऊन जाणाऱ्या सौरभ यादव यास अडविले. जुन्या भांडण पुन्हा उकरून काढून सौरभ यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संशयित अजय अष्टेकरने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने सौरभच्या डोक्यात वार केला तसेच त्याच्या हातालाही जखम झाली. संशयित अभि पवारने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी हत्याराने सौरभवर वार केला. तर अनोळखी युवकाने रस्त्यावर पडलेल्या विटा आणि दगडांनी त्यास मारहाण केली. यामध्ये सौरभ हा गंभीर जखमी झाला. दरम्यान हलेखोरांनी घटनास्थळावऊन पलायन केले. उपस्थितांनी जखमी सौरभ यास ऊग्णालयात दाखल केले. अद्यापपर्यत संशयितांना अटक करण्यात आली नाही.