For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जगातील सर्वात मजबूत आणि पावरफुल स्मार्टफोन

03:45 PM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात मजबूत आणि पावरफुल स्मार्टफोन

Oukitel WP 33 Pro या फोनमध्ये 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल. यासह या फोनमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स आहेत.

Advertisement

Oukitel WP 33 Pro : सध्या रोज नव नविन स्मार्टफोन लाँच होत आहेत. स्मार्टफोन खरेदी करताना रॅम आणि बॅटरी बॅकअप या दोन गोष्टी पाहिल्या जातात. Oukite या चायनीज मोबाईल  कंपनी जगातील सर्वात मजबूत आणि पावरफुल स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहे.

24GB रॅम आणि तब्बल 22,000mAh बॅटरी असलेला जगातील सर्वात मजबूत आणि पावरफुल स्मार्टफोन लाँच झाला आहे. 256 GB स्टोरेज,  MediaTek डायमेंशन 6100+ चिपसेट प्रोसेसर, 64 MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये 2408x1080 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 60Hz  रिफ्रेश रेट मिळतो.

Advertisement

या फोनमध्ये  136dB का दमदार लाउडस्पीकर सेटअप देखील देण्यात आला आहे. यामुळे या फोनचा वापर लाऊड स्पीकर प्रमाणे देखील करता येवू शकतो. या फोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये   तब्बल 22,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. एकदा चार्ज केल्यावर हा फोन 7 दिवस चालतो असा दावा या कंपनीने केला आहे.

Advertisement

Oukitel WP 33 Pro असे या फोनचे नाव आहे. Oukite या चायनीज मोबाईल  कंपनीचा हा फोन आहे.

Advertisement
Tags :
×

.