For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात कमी रुंदीची नदी

06:27 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात कमी रुंदीची नदी
Advertisement

उडी घेत ओलांडू शकता नदी

Advertisement

जगातील अनेक मोठमोठ्या नद्यांबद्दल तुम्ही ऐकले असेल. परंतु जगात एक अशी नदी आहे जिला सर्वात अरुंद नदी मानले जाते. जर लहान मुलाने देखील उडी घेतली तरीही तो सहजपणे एका काठावरून दुसऱ्या काठावर जाऊ शकतो असे सांगण्यात येते.

जगातील सर्वात अरुंद नदीचा मान हुआलाई नदीला मिळाला आहे. उत्तर चीनमध्ये वाहणाऱ्या नदीच्या नावावर हा विक्रम आहे. ही नदी 17 किलोमीटर अंतरापर्यंत वाहते. ही नदी सुमारे 10 हजार वर्षांपासून वाहत असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

या नदीची सरासरी रुंदी 15 सेंटीमीटर आहे. एकेठिकाणी ही रुंदी केवळ 4 सेंटीमीटर इतकीच आहे. रुंदी कमी असलेल्या या नदीची खोली कमाल 50 सेंटीमीटर इतकी आहे. ही नदी अंडरग्राउंड स्प्रिंगद्वारे बाहेर पडते आणि दलाई नावाच्या सरोवरात सामावते. ही नदी अत्यंत अरुंद असल्याने कुणीही सहजपणे उडी घेत ती ओलांडू शकतो.

तर जगातील सर्वात छोटी नदी हे अमेरिकेच्या मोंटाना प्रांतात आहे. या नदीचे नाव रो रिव्हर आहे. येथे मिसुरी नदी देखील वाहते, जिला अमेरिकेतील सर्वात लांब नदी म्हणून ओळखले जाते.  रो रिव्हरवरून एक मोहीम राबविण्यात आली होती. एका शाळेचे शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी रो नदीचे नाव जगातील सर्वात छोटी नदी म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील करू इच्छित होते. कठोर मेहनतीनंतर त्यांची ही मोहीम यशस्वी ठरली होती.

Advertisement
Tags :

.