पाण्याखाली जगातील सर्वात मोठी दफनभूमी
चुउक बेटसमुहाची धक्कादायक छायाचित्रे समोर आली असून ती पाहिल्यावर लोक याला पाण्यातील जगातील सर्वात मोठी दफनभूमी ठरवत आहेत. छायाचित्रांनी या विनाशकारी स्थानाच्या भयानक इतिहासाचा खुलासा केला आहे. येथे आजही बुडालेली जहाजे दिसून येतात. मानवी सांगाडे, जहाजावरील सामग्री आणि अन्य गोष्टी येथे विखुरलेल्या आहेत. हा शोध चुउक बेटसमुहात लागला असून येथे मोठ्या संख्येत जहाज आणि विमानांचे अवशेष विखुरललेले आहेत. या अवशेषांना आता एकत्रित केले जात आहे. नौदलाच्या नौका, जपानी ट्रकांचे अवशेष आणि जुने डायव्हिंग सूट येथे आहेत, या सर्व गोष्टी इतिहासातील विध्वंसाचा पुरावा आहेत, यात दुसरे महायुद्ध देखील सामील आहे.
काही अवशेष ऑपरेशन हेलस्टोनदरम्यान बुडालेल्या जहाजांचे आणि विमानांचे आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑपरेशन हेलस्टोन नावाने एक सैन्यसंघर्ष झाला होता. यात 4500 जपानी सैनिक मारले गेले होते. या ऑपरेशनमध्ये शेकडो विमाने आणि कित्येक नौका बुडाल्या होत्या. तसेच 40 अमेरिकन सैनिक मारले गेले होते. पाण्यातील हे अवशेष युद्धात वापरण्यात आलेल्या नौ
का आणि विमानांचे आहेत. अशाचप्रकारचे अवशेष पापुआ न्यू गिनी, फिलिपाईन्सच्या किनाऱ्यानजीक अणि इंडोनेशियानजीक आढळून आले आहेत. याचबरोबर पाण्यात खोलवर मिळालेल्या अवशेषांमध्ये ट्रकचा देखील समावेश आहे. होकी मारू जहाजाच्या अवशेषांमध्ये अद्याप वाहनाचे टायर, हेडलाइट्स आणि फ्रेम समवेत अनेक गोष्टी सामील आहेत.
छायाचित्रांमध्ये मानवी सांगाडे दिसत असले तरीही हे ठिकाण पाणबुड्यांमध्ये लोकप्रिय आहे. परंतु पाणबुडे तेथे पूर्ण खबरदारी बाळगत असतात. पाणबुड्यांनी खोल पाण्यात जात ही छायाचित्रे काढली आहेत. दोन दिवसांपर्यंत चाललेल्या ऑपरेशन हेलस्टोनमध्ये 250 जपानी विमाने नष्ट झाली होती. 1944 मध्ये अमेरिकेच्या सैनिकांकडून ही मोहीम पार पाडण्यात आली होती. यात मोठ्या संख्येत जपानचे सैनिक मारले गेले होते. तसेच 17 हजार टन संग्रहित इंधनाचे नुकसान झाले होते. हा दोन दिवसीय हवाई हल्ल्यांमध्ये नष्ट झाला होता. जपानी सैन्याच्या प्रमुख युद्धनौका अमेरिकेच्या या ऑपरेशनमुळे नष्ट होत बुडाल्या होत्या.