जगातील सर्वात मोठे भुयार
स्वीत्झर्लंडमध्ये झाली निर्मिती
जगातील सर्वात मोठे भुयार स्वीत्झर्लंडमध्ये आहे. याचे नाव गोथर्ड बेस टनेल असून स्वीत्झर्लंड सरकारने हे भुयार रेल्वेवाहतुकीसाठी तयार केले होते. 2016 मध्ये सुरू करण्यात आलेले हे भुयार सुमारे 57 किलोमीटर लांब आहे. या भुयाराला युरोपच्या सर्वात महत्त्वपूर्ण परिवहन मार्गांपैकी एक मानले जाते. या भुयाराच्या निर्मितीमुळे स्वीत्झर्लंड रेल्वेला मोठा लाभ झाला असून रेल्वे प्रवास देखील पूर्वीच्या तुलनेत अत्यंत वेगवान झाला आहे.
गोथर्ड बेस टनेलच्या निर्मितीचे काम 1999 मध्ये सुरु झाले हेते. याच्या निर्मितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. तर या भुयाराच्या निर्मितीत सुमारे 12 वर्षे लागली आणि याच्या पूर्ण प्रकल्पाकरता सुमारे 12 अब्ज स्वीस फ्रँक म्हणजेच सुमारे 12.5 अब्ज डॉलर्सचा खर्च आला आहे.
या भुयाराच्या निर्मितीकरता आलेल्या खर्चात एंटीलिया आणि बुर्ज खलिफा निर्माण करता आला असता. स्वीस फेडरल रेल्वेच्या अहवालानुसार या खर्चात यंत्रसामग्री, कामगारांच्या वेतनाचा खर्च आणि सुरक्षा उपाययोजना देखील सामील होत्या. या भुयाराच्या निर्मितीत सुमारे 2500 कामगारांनी हातभार लावला होता.
गोथर्ड बेस टनेलच्या डिझाइनमध्ये अनेक खास तांत्रिक वैशिष्ट्यांना सामील करण्यात आले होते, ज्यात वेंटिलेशन सिस्टीम, सुरक्षा उपाययोजना आणि रेल्वे संचालनाचा वेग सामील आहे. हा भुयारी मार्ग दोन मार्गिकांमध्ये विभाजित असल्याने यात रेल्वेंचा कमाल वेग 250 किलोमीटर प्रतितास इतका असतो, यामुळे हा मार्ग युरोपच्या सर्वात वेगवान रेल्वेमार्गांपैकी एक ठरतो.
गोथर्ड बेस टनेलच्या निर्मितीचे काम अल्पट्रान्झिट गोथर्ड एजी कंपनीने केले आहे. स्वीस फेडरल रेल्वेची ही एक सहाय्यक कंपनी आहे. भुयाराच्या निर्मितीत चार हेर्रेनकेनट ग्रिपर टनेल बोरिंग मशीन्सचा वापर करण्यात आला होता. यातील प्रत्येक मशीन 1400 फूट लांब होती. केवळ या मशीन्ससाठीचा खर्च 21 दशलक्ष डॉलर्स होता. याचबरोबर टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात आला होता. या मशीनमध्ये असलेल्या हायड्रोलिक आर्म्स मोठ्यातील मोठा दगडही चुऱ्यात बदलून टाकायचे. जर या दोन्ही मशीन्स नसत्या तर हे भुयार 2016 पर्यंत निर्माण होऊ शकले नसते असे बोलले जाते.