जगातील सर्वात मोठी क्रूज शिप
टायटॅनिकपेक्षा 5 पट मोठा आकार
रॉयल कॅरेबियन शिप पुढील वर्षी लाँच होणारी जगातील सर्वात मोठी क्रूज शिप ठरणार आहे. ही क्रूज शिप टायटॅनिक जहाजापेक्षा पाचपट मोठी आहे. यात विशाल वॉटरपार्कसमवेत अनेक शानदार आणि दंग करणाऱ्या सुविधा आहेत. ही शिप पुढील महिन्यात रवाना होणार आहे. याला आइकॉन ऑफ द सीज आणि वंडर ऑफ द सीज असेही म्हटले जात आहे.
ही क्रूज शिप 5000 प्रवाशांना सामावून घेण्यास सक्षम असून याचा आकार का छोट्या शहराइतका आहे. यटावर जगातील सर्वात मोठे सागरी वॉटरपार्क असून याचे नाव कॅटेगरी 6 ठेवण्यात आले आहे. यात 6 रिकॉर्ड ब्रेकिंग वॉटर स्लाइड आहेत. यात समुद्रात सर्वात वेगवानांपैकी एक एपिक नियर-वर्टिकल ड्रॉप्स आणि पहिले फॅमिली-राफ्ट स्लाइड सामील आहे. याचबरोबर जहाजावर सात पूल आणि 9 व्हर्लपूल देखील असतील.
रोमांच इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी क्रूजवर सर्वकाही उपलब्ध होणार आहे. हे विशाल जहाज 365 मीटर लांब असून याचे वजन 2,50,800 टन आहे. तर टायटॅनिकचे वजन 46,329 टन इतके होते. लांबीप्रकरणी हे जहाज आयफल टॉवरपेक्षा अधिक आकाराचे आहे. जहाजाचा आकार भव्य असल्याने याला 20 डेकमध्ये विभागण्यात आले असून यात लोक दिवसरात्र मोठ्या आरामाम मौजमजा करू शकतील. तसेच क्रूज शिपवर एक एक्वापार्क आणि स्नॅक बार तसेच लाउंजर देखील आहे. रोमांचाक सुविधांमध्ये स्काय वॉक देखील सामील करण्यात आला आहे. तर ज्या लोकांना डेकवर राहणे पसंत आहे, अशांसाठी तेथे अनेक रेस्टॉरंट्स, एक्वा डोमचा शो तसेच आइस रिंक देखील असणार आहे.