रेड्याची जगाला पडली भुरळ
3 वर्षांत झाला 6 फूटांचा
सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या एक रेडा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चर्चेत आले आहे. याचे नाव किंग काँग असून त्याच्याविषयी लोक मोठ्या प्रमाणात चर्चा करत आहेत.
सद्यकाळात एक रेडा स्वत:चे मजबूत शरीर आणि क्यूट जेस्चरमुळे पूर्ण जगात प्रसिद्धी मिळवून आहे. त्याला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. किंग काँगची उंची केवळ 3 वर्षांमध्ये 6 फूट 8 इंच इतकी झाली आहे. हा सामान्य रेड्यांच्या तुलनेत खूपच वेगळा आहे. किंग काँगला आतापर्यंतचा सर्वात प्रेमळ रेडा मानले जात आहे. हा रेडा आक्रमक नाही, तर माणसांसोबत खेळतो आणि त्याला केळी खाणे पसंत आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार किंग काँग थायलंडच्या निनलानी फार्ममध्ये राहतो, एका सामान्य प्रौढ रेड्यापेक्षा याची लांबी सुमारे 20 इंच अधिक आहे. हा अनोखा रेडा स्वत:चे वय आणि आकारामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. निनलानी फार्मचे मालक सुचार्ट बून्चरोएन यांनी या रेड्याचा जन्म 1 एप्रिल 2021 रोजी झाला होता, अशी माहिती दिली आहे.
किंग काँग विशाल असला तरीही स्वभावाने एखाद्या पाळीव श्वानासारखा आहे. किंग काँग अत्यंत आज्ञाधारक अन् समजूतदार आहे. त्याला लोकांसोबत खेळणे, स्वत:ची पाठ थोपटून घेणे, आणि पळणे आवडते. सर्वसाधारणपणे तो केळी खाणे आणि तलावात पाण्यात डुंबणे पसंत करतो. निनलानी फार्ममध्येच त्याला जन्म देणारी म्हैस आहे., तो अन्य वॉटर बफेलोसोबत राहते. परंतु त्याचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आले असून त्याची लांबी आणि उंची आणखी वाढेल, असे मानले जात आहे.