For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विचित्र वास्तूंचे जग...

06:48 AM Mar 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
विचित्र वास्तूंचे जग
Advertisement

‘सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भूत असू शकते, ही म्हण आपल्याला परिचित आहे. ही म्हण मानवनिर्मित रचनांच्या संदर्भातही खरी आहे. विशेषत: मानवाने निर्माण केलेल्या वास्तू रचना मानवालाच आश्चर्यचकित करतात. जगात अशा अनेक वास्तू आहेत. त्यांच्यापैकी काही वास्तूंच्या आपल्याला परिचय असणे आवश्यक आहे.

Advertisement

  1. अमेरिकेतील स्वातंत्र्य मंदीर- विश्वशांतीच्या उद्देशाने याची निर्मिती मसुरी शहरात करण्यात आली आहे. त्याची निर्मिती क्रिस्त समाज नावाच्या संघटनेने केली. या समाजाच्या प्रमुखांना साक्षात्कार झाल्यानंतर ही निर्मिती करण्यात आल्याची वदंता आहे. 300 फूट उंचीचे हे मंदीर पर्यटकांचे आवडते आहे.
  2. चीनची रेन वास्तू- चीनच्या शांघाई शहरात कोपेनहेगन येथील जार्के इंजल्स समूहाने या अद्भूत वास्तूची निर्मिती केली आहे. या वास्तूत चीनी स्थापत्यकलेची वैशिष्ट्यो तर प्रकट होतातच, पण त्यांना अत्याधुनिकतेची जोडही देण्यात आली आहे. दोन वास्तू एकमेकांमध्ये संमिलित झाल्यासारखी या वास्तूची रचना आहे.
  3. अमेरिकेतील बास्केट वास्तू- अमेरिकेतील ओहायो शहरातील ही वास्तू तिच्या नावाप्रमाणेच एखाद्या मोठ्या बास्केटप्रमाणे दिसते. एक सुंदर वास्तू अशी तिची ख्याती आहे. जगात अलिकडच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या अद्भूत वास्तूंपैकी एक अशी तिची ख्याती आहे. तिला पाहण्यासाठीही अनेकजण येतात.
  4. भारतातील ‘अंडाकृती’ कार्यालय- अंड्याचा नैसर्गिक आकारात, पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेली ही वास्तू दिल्लीत आहे. तिचा परिचय सायबरटेक्चर एग ऑफिस वास्तू अशी आहे. ही वास्तू पर्यावरणस्नेही असल्याने सांप्रतच्या काळात महत्वाची आहे. हा अभियांत्रिकी चमत्कार आहे.
Advertisement
Tags :

.