For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी भंडारी मंडळाचे कार्य कौतुकास्पद - दीपक केसरकर

06:00 PM Jul 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी भंडारी मंडळाचे कार्य कौतुकास्पद   दीपक केसरकर
Advertisement

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचा द्विवार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा भंडारी भवन सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रतिवर्षी मंडळाच्या वतीने शिष्यवृत्तीधारक दहावी बारावी तसेच पदवीधर व पदव्युत्तर परीक्षेतील विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर विशेष नैपुण्य प्राप्त समाजातील व्यक्तींचा गौरव करण्यात येतो यावर्षी प्रथमच हा कार्यक्रम भव्य अशा स्वमालकीच्या जागेत भंडारी भवन सभागृहामध्ये घेण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंददेकर हे होते. व्यासपीठावर माजी शिक्षण सभापती मंडळाचे उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, देविदास आडारकर ,हनुमंत पेडणेकर ,महिला अध्यक्षा शीतल नाईक, भंडारी पतपेढी चेअरमन गुरुदास पेडणेकर ,संजय पिळणकर लऊ कुडव, शर्वरी पेडणेकर, निलेश गुरव ,आनंद कोंडये ,दिलीप पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी‌ उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले . त्यावेळी केसरकर म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील मुलांना जर्मनीत नोकरी देण्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत यासाठी आपल्या समाजातील होतकरू मुलांना ही संधी प्राप्त करून देण्यासाठी मी अग्रेसर राहील.  आपला समाज नेहमी माझ्या पाठीशी राहिलेला आजच्या जीवाला विद्यार्थ्यांनी नवनवीन संधी शोधून आपली प्रगती करणे महत्त्वाचे आहे ज्या विद्यार्थ्यांना आपले करियर या स्टेजला समजले ते विद्यार्थी जीवनात निश्चितपणे यशस्वी होते भंडारी समाज न्याती यांनी स्वमालकीच्या जागेत सभागृह निर्माण करून हा कार्यक्रम घेतला याचे मला कौतुक आहे.  या सभागृहाच्या शुशोभीकरणासाठी केसरकर यांनी एक लाख रुपये देणगी दिली भंडारी न्यातीच्या होतकरू गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करू असे आश्वासन दिले.  यावेळी संजय पिळणकर देविदास आडकर तसेच दहावी तालुक्यात न्यातीतून प्रथम आलेला विद्यार्थी राज जीवबा वीर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संगत ही सर्वात महत्त्वाची आहे संगतीतूनच आपण घडलो संगत चांगल्या मित्रांची ठेवा म्हणजे निश्चितच यश आपल्याकडे येईल . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर, प्रास्ताविक गुरुनाथ पेडणेकर तर आभार नामदेव यांनी मानले . या कार्यक्रमासाठी सुरेश राऊत, बंड्या पराडकर, संतोष वैज, बाळू साळगावकर, अरविंद वराडकर ,चंद्रकांत वाडकर, दीपक जोशी ,समता सूर्याजी ,उमा वराडकर ,देवता पेडणेकर ,दीपक सरमळकर ,बाळू तळणीकर, तसेच सावंतवाडी महिला भंडारी मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.