For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परिचारिकांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी

10:33 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
परिचारिकांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी
Advertisement

मीनाक्षी पाटील यांचे प्रतिपादन : अरिहंत हॉस्पिटलमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा, विविध स्पर्धांचे आयोजन

Advertisement

बेळगाव : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ही भावना नजरेसमोर ठेवते ती म्हणजे नर्स (परिचारिका) असल्याचा अभिमान आहे. नर्स ही देवाने जगाला दिलेला एक अवतार आहे. रुग्णसेवेचा भार खांद्यावर घेऊन ऊग्णांना नवजीवन देण्यात परिचारिकांचा मोठा वाटा असतो. ही एक नि:स्वार्थ सेवा असून आपल्या कुटुंबीयांसह रुग्णांची काळजी घेणाऱ्या परिचारिकांचे कार्य सर्वश्रेष्ठ व ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन मीनाक्षी पाटील यांनी केले. अरिहंत हॉस्पिटलमध्ये परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. माधुरी दीक्षित होत्या. पाटील पुढे म्हणाल्या, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असले तरी त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी परिचारिकांवर असते. आपल्या जीवाची पर्वा न करता ऊग्णांची सेवा करण्याची दृढ इच्छाशक्ती ही केवळ परिचारिकांमध्येच असू शकते. त्यांची सेवा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्येपासून ऊग्णाला मुक्ती मिळवून देण्यात परिचारिकांचा खारीचा वाटा असतो, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. सोनाली सरनोबत यांनी, अरिहंत हॉस्पिटल अत्यंत कमी दिवसांत नावाऊपास आले आहे. हे हॉस्पिटल उत्कृष्ट डॉक्टरांसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण आता सर्वश्रेष्ठ परिचारिकांसाठीही प्रकाशझोतात आले आहे. परिचारिकाच हॉस्पिटल चालवतात. त्यांच्याविना हॉस्पिटल कार्यरत ठेवणे अशक्मय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बेस्ट नाईंटिंगेल व मदर तेरेसा पारितोषिक देऊन परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. वरदराज गोकाक, डॉ. निखिल दीक्षित, डॉ. गणेश कोप्पद, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे, डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. सूरज पाटील, डॉ. युवराजकुमार यड्रावी यांच्यासह डॉक्टर्स, नर्सेस आदी उपस्थित होते.

Advertisement

परिचारिकांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा

परिचारिकांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. महिलांना घर व नोकरी सांभाळताना तारेवरची कसरतच करावी लागते. मात्र, बहुसंख्य परिचारिका या संपूर्ण कुटुंब सांभाळत आपली ऊग्णसेवा अखंडितपणे लीलया पेलतात. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्याचबरोबर परिचारिकांचे ऊग्णसेवेप्रती असणारे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन डॉ. एम. डी. दीक्षित यांनी केले.

Advertisement
Tags :

.