गरूड मंडप उतरण्याचे काम अंतिम टप्प्यात! क्रेनने उतरवले जाताहेत लहान- मोठे खांब
डिसेंबरपासून नवा मंडप उभारणीला सुरवात; नवरात्रोत्सवासाठी गऊड मंडपातील सदरेभोवतीने पत्र्याचा मंडप
कोल्हापूर प्रतिनिधी
अंबाबाई मंदिराचा अविभाज्य घटक बनून उभा असलेला सागवानी लाकडाचा गऊड मंडप उतऊन घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या पावणे दोन महिन्यांपासून साताऱ्यातील ओसवाल कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी गऊड मंडप उतरून घेण्याचे काम करत आहेत. मंडपाचे छत्र व चारही बाजूचे नक्षीदार लाकुड पूर्णपणे उतरून घेतले आहे. मंडपालगतचे छोटेसे दुकानही हटवले आहे. सध्या क्रेनच्या मंडपाचे 44 लहान-मोठे खांब उतरवले जात आहेत. येत्या दोन दिवसात मंडप उतरण्याचे काम पूर्ण होणार आहे. तसेच मंडपाने झाकल्या गेलेल्या अंबाबाई मंदिरातील गणपती चौकाचे पश्चिम बाजूचे दगडी नक्षीदार बांधकामही उजेडात येणार आहे.
डिसेंबरच्या अखेरीस अथवा जानेवारी 2025 मध्ये सुरवातीपासून जुन्या गऊड मंडपासारखा हुबेहुब मंडप उभारणीच्या कामाला सुरवात केली जाईल, असे ओसवाल कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार शिवाजी सुतार यांनी सांगितले. ते म्हणाले, की उतरून घेतलेल्या गरूड मंडपाच्या उभारणीसाठी वापरलेले सागवानी लाकुड हे तब्बल पाचशे वर्षापूर्वीचे आहे. याचा पुरावा मंडपाच्या लाकडातील वार्षिक कड्यांच्या केलेल्या अभ्यासातून मिळत आहे. शिवाय मंडपासाठी वापरलेले सर्व सागवानी लाकुड अतिशय जिर्ण झालेले आहे. त्यामुळे मंडप तातडीने उतऊन घेणे गरजेचे होते. आगामी पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत जुन्या गऊड मंडपासारखा मंडप उभारणीचे नियोजन केले आहे. जुन्या मंडपाची मापे, आडक आणि स्वऊपाचा अभ्यास करून बनवलेल्या आराखड्यानुसार मंडप उभारणी करण्यात येणार आहे.
सदरेवरच उत्सवमूर्तीची पालखी विराजमान होणार
गऊड मंडप गतवर्षी पूर्णत: दूरवस्थेत होता. मंडप कोसळू नये म्हणून खांबांना लोखंडी पट्टयांचा आधार दिला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या नवरात्रोत्सवात अंबाबाईचे धार्मिक विधी मंडपालगत उभारलेल्या कापडी मंडपात पार पडले. याच मंडपात अंबाबाईची पालखीही विराजमान झाली होती. यंदा मात्र मंडप उतऊन घेण्याचे काम पूर्ण होत असून त्यातील सदरे भोवती पत्र्याचा मंडप उभारला जाणार आहे. या मंडपाच्या आश्रयाखाली नवरात्रोत्सवातील अंबाबाईचे धार्मिक विधी पार पडणार आहेत. तसेच याच मंडपात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची पालखी विराजमान होईल, असे देवस्थान समितीचे प्रशासक शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.