Satara News : खटाव तालुक्यातील 'त्या' अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा अखेर हातोडा
गणेशवाडी रोडवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाची भूमिका
वहूज : खटाव तालुक्यातील बहुज येथील गणेशवाडी रोड लगत असणाऱ्या शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांबर अखेर हातोडा पडला. तहसीलदार बाई माने यांच्या आदेशाने या कारवाईस सुरुवात झाली आहे. जवळपास याठिकाणी ४० ते ५० परप्रांतीय कुटुंबे गेली २५ ते ३० वर्षापासून वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून येथील रहिवाशांना प्रशासनाच्या वतीने लेखी नोटीस देऊन शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामे स्वखर्चाने काढण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या.
सदर सुचनेचे पालन न केल्याने प्रशासनाच्या वतीने कठोरभुमिका घेत ही कारवाई करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात येथील अतिक्रमणे हटविण्यास प्रशासकीय अधिकारी व यंत्रणा या ठिकाणी गेली असता तेथील रहिवाशांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला व अतिक्रमण काढू नये, अशी विनंती केली. परंतु तहसीलदार बाई माने यांनी रहिवाशांना आपणांस सदर जागा रिकामी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
इतर अनधिकृत बांधकामावरही कारवाई व्हावी
तहसीलदार बाई माने यांनी घेतलेली भुमिका याचे कौतुक होत आहे. दरम्यान शहरातील इतर अतिक्रमणाबाबत तहसीलदार बाई माने यांनी अशीच कठोर भूमिका घेऊन चौकाचौकात शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे, रोड लगत असणाऱ्या विट भट्ट्या, रोड लगत व दैनदिन वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने काढवीत, अशी चर्चा सुजान नागरिकांतून येत आहे.