अनोळखी लोकांचे दु:ख कमी करण्याचे काम
जगात अनेक प्रकारच्या विचित्र नोकऱ्या अस्तित्वात आहेत. आता एका युवतीने पैसे कमाविण्यासाठी लढविलेली शक्कल व्हायरल झाली आहे. ही युवती पैसे आकारून अनोळखी लोकांचे दु:ख कमी करण्याचे काम करते. तिने याकरता रितसर दरही ठरविला आहे. ज्यात छोट्या दु:खासाठी 200 रुपये तर मोठ्या दु:खासाठी 1 हजार रुपयांचे शुल्क घेतले जाते. मी लोकांचे दु:खे ऐकते, कुणाला स्वत:चे दु:ख ऐकवायचे असेल तर मी उपलब्ध आहे. किरकोळ किंवा छोट्या दु:खासाठी 200 रुपये तर मोठ्या दु:खासाठी 400 रुपयांचे शुल्क आहे. तर सोबत रडायचे असल्यास 1 हजार रुपये खर्च करावे लागतील, असे एम्माने सांगितले आहे. एम्माचे हे काम आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिला या कामाकरता मोठी मागणी मिळत असल्याचे समजते. एम्मा ही लोकांच्या दु:खाच्या क्षणी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे काम करते. तिच्या या व्हिडिओला 21 लाखाहून अधिकवेळा पाहिले गेले आहे. तर 26 हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. भारतात हे काम फुकट केले जात असल्याची कॉमेंट अनेकांनी तिच्या व्हिडिओवर केली आहे.