महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटविण्यात यावा

07:00 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बांगलादेशात अॅटर्नी जनरलकडून मागणी : 90 टक्के लोकसंख्या मुस्लीम असल्याचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था/ढाका

Advertisement

बांगलादेशचे अॅटर्नी जनरल मोहम्मद असदुदज्जमां यांनी देशाच्या राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटविण्याची मागणी केली आहे. बांगलादेशची 90 टक्के लोकसंख्या मुस्लीमधर्मीय असल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर केला आहे. बांगलादेशात 17 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असून यात हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. तेथील हिंदूंचे प्रमाण सुमारे 8 टक्के आहे.  न्यायाधीश फराह महबूब आणि देवाशीष रॉय चौधरी यांच्या खंडपीठासमोर 15 व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेवरील सुनावणीदरम्यान असदुज्जमां यांनी हा युक्तिवाद केला आहे. अनुच्छेद 2 अ मध्ये देश सर्व धर्मांना समान अधिकार देणार असल्याचे नमूद आहे. तर अनुच्छेद 9 हा बंगाली राष्ट्रवादाविषयी    भूमिका व्यक्त करणारा आहे. हा एक प्रकारचा विरोधाभास असल्याचे अॅटर्नी जनरल असदुज्जमां यांनी म्हटले आहे.

शेख मुजीबुर रहमान यांना ‘राष्ट्रपिता’च्या स्वरुपात घोषित करण्यासारखी घटनादुरुस्ती राष्ट्रीय विभाजन निर्माण करते. शेख मुजीबुर यांचा सन्मान केला जावा, परंतु कायदा आणून ते लागू करण्यात आल्याने लोकांमध्ये फूट पडत आहे. घटनादुरुस्ती या लोकशाहीच्या समर्थनासाठी असाव्यात, अधिनायकवादाची बाजू घेणारी घटनादुरुस्ती असू नये असे असदुज्जमां यांनी म्हटले आहे. असदुज्जमां यांनी काळजीवाहू सरकारच्या व्यवस्थेला संपुष्टात आणण्याच्या शेख हसीना सरकारच्या निर्णयाची निंदा केली आहे. ही व्यवस्था समाप्त केल्याने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांशी तडजोड झाली आहे. जनतेचा विश्वास कमकुवत झाला आणि बांगलादेशच्या लोकशाहीच्या पायाला नुकसान पोहोचल्याचा दावा अॅटर्नी जनरलनी केला.

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार

अॅटर्नी जनरल असदुज्जमां यांनी राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष शब्द हटविण्याची केलेली मागणी ही बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या धर्मांध भूमिकेशी जोडून पाहिली जात आहे. शेख हसीना यांना धर्मनिरपेक्ष नेत्या म्हणून ओळखले जात होते. तर अंतरिम सरकारमध्ये जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या धार्मिक कट्टरवाद पसरविणारे राजकीय पक्ष सामील आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article