‘ओसीआय’ शब्द चुकून वापरला
गोवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
पणजी : रविवार 30 नोव्हेंबर 2025 रोजी गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोव्यात सुरू असलेल्या मतदारयादी उजळणी मोहिमेची माहिती देण्यासाठी माध्यमांना संबोधित करताना परदेशी मतदारांचा उल्लेख करताना ओव्हरसीज मतदारांचा उल्लेख करताना चुकून ‘ओसीआय’ हा शब्द वापरला, असे सीईओंनी स्पष्टीकरण दिले आहे. गोव्यात 88 ओव्हरसीज मतदार आहेत जे भारतीय नागरिक आहेत पण ते विदेशात राहतात.आयोगाने त्यांच्यासाठी ऑनलाईन ईएफ सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. सीईओंनी स्पष्ट केले की, ओव्हरसीज मतदारांऐवजी ओसीआय हा शब्द वापरण्यात आला होता आणि ओव्हरसीज मतदारांमध्ये ओसीआय हा शब्द वापरल्यामुळे निर्माण झालेल्या शंका आणि चिंता दूर करण्यासाठी हे स्पष्टीकरण केले आहे.