अजब सिंड्रोमने त्रस्त आहे महिला
गोंगाट ऐकताच मेंदू गमावतो शरीराचे नियंत्रण
जगातील काही लोक कुठल्याच गोष्टीला घाबरत नाहीत, तर याच्या उलट काही लोक साध्यासाध्या गोष्टींना घाबरत असतात. एका महिलेला रस्ता ओलांडताना भीती वाटते. रस्ता ओलांडल्यास आपले शरीर दगडाप्रमाणे घट्ट होईल अशी भीती या महिलेला वाटते.
कॅनडात राहणारी गायिका सेलिन डियॉनला एक अजब सिंड्रोम असून यामुळे ती कधीच रस्ता ओलांडू शकत नाही. स्नायू जाम होत तिला जवळपास दगडाप्रमाणे घट्ट शरीरात रुपांतरित करत असतात. सेलिनने स्वतःच्या चाहत्यांना स्वतःच्या स्टिफ पर्सन सिंड्रोमबद्दल सांगितले आहे. हा सिंड्रोम 10 लाखातील एका व्यक्तीलाच होत असतो.
सेलिन डियॉनप्रमाणेच केरन नावाची महिला जेव्हा स्वतःच्या शरीराचे नियंत्रण गमावून बसते तेव्हा जवळपास दगडाप्रमाणे तिचे शरीर होते. स्टिफ पर्सन सिंड्रोममध्ये जर कुणी उडी मारण्यास सांगितले तर पीडित व्यक्ती कोसळतो किंवा त्याचे शरीर आणि स्नायू घट्ट होऊ लागतात. केरनला ही समस्या 12 वर्षांपासून असून याची सुरुवात पाठदुखीने झाली होती. मग तिला काही काळाने रोबोटिक जाणीव होऊ लागली. 5 वर्षांपूर्वी तिला स्वतःच्या एसपीएस सिंड्रोमबद्दल कळले. तर 3 वर्षांपूर्वी दुसऱया ठिकाणी रहायला जात असताना कधीच दगडाप्रमाणे एकाच ठिकाणी खिळून राहू शकते याची जाणीव तिला झाली.
स्टिफ पर्सन सिंड्रोम
केरन रुग्णालयात पोहोचल्यावर न्यूरोलॉजिस्टने तिला काही विशेष चाचण्या करण्याची सूचना केली होती. या चाचण्यांमधून स्नायूंवरील मेंदूचे नियंत्रण कशाप्रकारे जाते हे दिसून आले. तिच्यासाठी केवळ रस्ताच ओलांडणे नव्हे तर बूट-सॉक्स घालणेही अनेकदा अवघड ठरते. तिचे दैनंदिन जीवन आता पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही. अनेकदा ती बसल्याबसल्याच जाम होऊन जाते आणि तिला उठता देखील येत नाही.