कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलेने 200वेळा करविलीप्लास्टिक सर्जरी

06:33 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पायावरील त्वचा मृतप्राय

Advertisement

देवाने जगातील प्रत्येक गोष्ट एकप्रकारे सुंदरच निर्माण केली आहे. परंतु माणसाला स्वत:च्या रुपात बदल करण्याची इच्छा निर्माण झाल्याने अनेक प्रकारच्या पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरीद्वारे जगातील अनेक लोक स्वत:चा लुक बदलत असतात. परंतु जर  निसर्गदत्त स्वरुपात बदल केला तर त्याचे चांगलेवाईट परिणामही भोगावे लागत असतात.

Advertisement

सोशल मीडियावर प्लास्टिक सर्जरीचे व्यसन जडलेल्या एका महिलेने स्वत:च्या या अॅडिक्शनचे परिणाम लोकांसोबत शेअर केले आहेत. कॅलिफोर्नियात राहणाऱ्या मोनीके ए एलन या महिलेला प्लास्टिक सर्जरी करविण्याचे व्यसन जडले आहे. आतापर्यंत मोनीकेने स्वत:च्या शरीराच्या विविध हिस्स्यांमध्ये सुमारे 200 वेळा प्लास्टिक सर्जरी करविली आहे. यातील केवळ नाकावरच तिने 24 वेळा शस्त्रक्रिया करविल्या आहेत परंतु आता तिने या व्यसानचे परिणाम लोकांसोबत शेअर केले आहेत.

शस्त्रक्रियेमुळे माझ्या पायांची त्वचा मृतपाय ठरली असून पार्श्वभागात अनेकदा सिलिकॉन इम्प्लांट करविले आहे. हे इम्प्लांट हळूहळू खालच्या दिशेने सरकू लागल्याने अत्यंत बिकट स्थिती ओढवत असल्याचे ती सांगते. तुलनेत स्वस्त शस्त्रक्रियेचे गंभीर परिणाम मोनीकेला भोगावे लागत आहेत. यामुळे तिला आता नीट चालता देखील येत नाही.

 

या शस्त्रक्रियेद्वारे अधिक सुंदर दिसण्याची माझी इच्छा होती, परंतु आता मी एखाद्या जोकरप्रमाणे दिसतेय जेथे कुटले जाते, तेथे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असतात असे तिने सांगितले आहे. मोनीकेला आता स्वत:च्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. मोनीकेच्या या सोशल मीडियावरील स्टोरीला आता मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article