महिलेला झाला अजब आजार
भीतीमुळे स्वत:ला घेते कोंडून
इंग्लंडच्या डेवोन येथे राहणाऱ्या एका महिलेला दुर्लभ आणि अजब आजार आहे. यामुळे ती स्वत:ला बेडरुममध्ये केबल लॉक लावून कोंडून घेते आणि मगच झोपी जाते. माझ्या पतीला या स्थितीबद्दल कुठलाच आक्षेप नाही आणि ते यावर सहमत झाले आहेत. रात्री झोपल्यावर मी अत्यंत वेगळे व्यक्तिमत्त्व धारण करत असल्याचे या महिलेचे सांगणे आहे.
संबंधित महिला एक आनंदी विवाहित आई आहे आणि एका दुर्लभ झोपेच्या आजाराने पीडित आहे. ती मित्रपरिवारासोबत असते तेव्हा ती रात्री स्वत:ला खोलीत चांगल्याप्रकारे बंद करून घेते, जेणेकरून कुठल्याही स्थितीत बाहेर पडता येऊ नये. रात्री झोपल्यावर मी अत्यंत वेगळ्या व्यक्तिरेखेत शिरते असे या महिलेचे सांगणे आहे.
50 वर्षीय महिलेला एक दुर्लभ झोपेचा आजार आहे. यामुळे ती झोपताना स्वत:च्या बाजूला असलेल्या कुठल्याही व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवू लागते. ज मी अन्य कुणाच्या घरात थांबणे टाळते, असे या महिलेचे सांगणे आहे.
मी पतीसोबत एकटीच राहते आणि ते कधीच तक्रार करत नाहीत. माझ्या मुली आता 25 आणि 30 वर्षांच्या आहेत. त्या आता आमच्यासोबत राहत नाहीत. कुठल्याही घटनेनंतर मला काहीच आठवणीत राहत नाही. याचमुळे हे माझ्यासाठी भ्रमित करणारे असते. त्यावेळी माझे माझ्यावर कुठलेच नियंत्रण नसते. याचमुळे अत्यंत लाजिरवाणी स्थिती निर्माण होते, परंतु सुदैवाने मी असे घडू नयेत नसल्याचे महिलेने सांगितले आहे.
2021 मध्ये रोगाचे निदान
महिलेला 2021 मध्ये स्वत:च्या डॉक्टराशी भेटल्यावर या स्थितीविषयी कळले. कंटेंट क्रिएटर आणि मॉडेल असलेल्या महिलेला आपल्याला न्यूरोलॉजिकल समस्याची असल्याची चिंता होती. कारण झोपेत चालणे, झोपेत बडबडणे आणि कधीकधी बिछाना ओला करण्याची समस्या देखील होती.
बाहेर वास्तव्यावेळी खबरदारी
महिलेला जर रात्री बाहेर रहावे लागेल तर ती विशेष खबरदारी बाळगते. यात बेडरुमच्या दरवाजावर बॅरिकेड लावणे देखील सामील आहे. मी दरवाजाच्या हँडलच्या चहुबाजूला केबल लॉक गुंडाळते, मग झोपेत देखील मी दरवाजा उघडू शकत नाही आणि कुणाच्या बेडरुममध्ये जाऊ शकत नसल्याचे महिलेचे सांगणे आहे.
झोपेत पाठविते मेसेज
मी झोपेत असताना सफाई देखील करू लागते, कधीकधी मोबाइलवरून एखाद्याला टेक्स्ट मेसेज देखील पाठविते. परंतु सकाळी उठल्यावर मला यातील काहीच आठवडत नाही. हे ऐकण्यास विचित्र वाटते, परंतु स्वत:च्या स्थितीविषयी कुणाला काही सांगत नसल्याचे महिलेने म्हटले आहे.