For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गळाभेटीचेही पैसे घेते महिला

06:50 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
गळाभेटीचेही पैसे घेते महिला

तासाभरात वसूल करते 7400 रुपये

Advertisement

जगात अनेक प्रकारच्या नोकऱ्या आहेत. काही लोकांच्या नोकरीची मोठी मागणी असते आणि त्यांना स्वत:चा मोठा वेळ यात घालवावा लागतो. तर काही लोकांची नोकरी अशी असते, ज्यात त्यांना शारीरिक मेहनत कमी आणि वृत्ती अधिक दाखवावी लागते. एक अशीच नोकरी प्रोफेशनल कडलरची असून यात लोक प्रेम आणि दिलासा मिळविण्यासाठी पैसे खर्च करतात.

आमच्या देशात लोक अनेक कारणांसाठी परस्परांची गळाभेट घेत असतात. आनंद असो किंवा दु:ख गळाभेटीमुळे समोरचा व्यक्ती भावुक होतो. परंतु विदेशात प्रेमाची झप्पी देखील पैसे दिल्यावरच मिळते. अनिको रोज नावाची महिला प्रोफेशनल कडलर आहे. ती लोकांची गळाभेट घेत त्यांना मानसिक दिलासा मिळवून देण्याचे काम करते.

Advertisement

अनिको रोज नावाची महिला केवळ लोकांची गळाभेट घेऊन पैसे कमावत आहे. अमेरिकेच्या मँचेस्टरमध्ये राहणारी ही महिला याच्या माध्यमातून कमाई करत असून तिच्याकडे ग्राहकांची रांग लागलेली असते. दर तासासाठी ती सुमारे 7400 रुपये आकारते. 42 वर्षीय अनिको 3 वर्षांपासून कडलिंगचे काम करत ओ. स्पर्शाद्वारे मानसिक आरोग्य बरे राहते, याद्वारे आनंदाचे हार्मोन तयार होतात आणि माणसाला तणाव, एकाकीपणा आणि उदासीनतेपासून लढण्यास मदत होते असे तिचे सांगणे आहे.

Advertisement

अशाप्रकारच्या कडलिंगद्वारे ऑक्सिटोन हॉर्मोन रिलीज होतात, ज्याला लव ड्रग म्हटले जाते. हे ग्राहकांना प्रेम आणि सुरक्षेची अनुभूती देतात. डोपामाइन आणि सेरोटोनिन यासारख्या हॉर्मोनमुळे व्यक्ती आनंदी समजू लागतो असे ती सांगते.

अनिको एक प्रोफेशनल कडल थेरपिस्ट असून ती लोकांना मदत करते. तिच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये 20 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंतचे ग्राहक सामील आहेत. तिची  थेरपी सर्वसाधारणपणे एक तासाची असते.

Advertisement
Tags :
×

.