महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वादळी चर्चेने आज होणार हिवाळी अधिवेशनाची सांगता

12:41 PM Dec 15, 2023 IST | DHANANJAY SHETAKE
suvarn vidhansoudh
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकार विरोधात भाजप आणि निजद असा सामना अधिवेशनात पाहायला मिळाला.
विरोधकांनी कायदा सुव्यवस्था, लिंगायत आरक्षण, ऊस उत्पादक, दुष्काळ आणि उत्तर कर्नाटक विषया वरील प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा झाली. तसेच विविध महत्त्वाची विधेयके देखील संमत करण्यात आली आहेत. राज्यात दुष्काळ,भीषण पाणी टंचाई असताना बेळगावात अधिवेशन होणार की नाही याबाबत चर्चा होती.मात्र अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. चार डिसेंबर पासून अधिवेशन सुरू झाले.या अधिवेशनाची आज सांगता होणार आहे.अधिवेशन एक किंवा दोन आठवड्यांनी वाढविले जावे किंवा एक महिना अधिवेशन व्हावे अशी विरोधी पक्ष नेत्यांनी सातत्याने मागणी केली.मात्र सरकार तर्फे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज शुक्रवारी दुपारीच अधिवेशनाची सांगता होईल अशी शक्यता आहे.एकूण 10 दिवसाच्या या कर्नाटक हिवाळी अधिवेशना दरम्यान 68 आंदोलने व निदर्शने झाली तर 17 विविध संघ - संस्थांच्या वतीने सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#belgaum#goverment#karanataka#mla#MLC#movement#suvernsaoudh#tarunbharat#WinterSession
Next Article