महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अख्खं कुटुंब रंगलंय बेकायदेशीर बांधकामांत

11:00 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हरमलचे माजी सरपंच बर्नाड फर्नांडिस यांची ‘समाजसेवा’ : सरकारी यंत्रणेशी हातमिळवणी, उच्च न्यायालयाचा हातोडा

Advertisement

पणजी : हरमल येथील बेकायदेशीर मालमत्ताप्रकरणी राजीनामा देण्यास भाग पडलेले माजी सरपंच बर्नाड फर्नांडिस यांच्या घरातील सदस्यांसोबत अन्य नातेवाईकही अनधिकृत बांधकाम उभारण्यात आणि त्यात व्यावसायिक आस्थापने सुऊ करण्यात गुंतल्याचे काल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात उघड झाले आहे. यामुळे, या सर्व बांधकामांची सविस्तर माहिती 14 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी, असा आदेश खंडपीठाने संबंधित सरकारी यंत्रणांना दिला आहे. हरमल किनारी भागात असलेल्या गिरकरवाड्यावरील ‘विकास प्रतिबंधित’ क्षेत्रातील (एनडीझेड) बेकायदेशीर 64  बांधकामांना ’कारणे दाखवा’ नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई सुऊ करण्यास आणि त्यातील व्यावसायिक असलेली 49  आस्थापने सील करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचा गोवा खंडपीठाने यापूर्वीच दिला आहे.

Advertisement

 ‘एनडीझेड’मध्ये उभारली बांधकामे

प्रशासकीय यंत्रणांनी तपास केल्यानंतर तत्कालीन सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांच्या वडिलांच्या आणि चुलत्याच्या नावावर ‘विकास प्रतिबंधित’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम असल्याचे समोर आल्यानंतर ही दोन्ही बांधकामे हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

 फर्नाडिस यांना नोटिस बजावा

याशिवाय ‘एनडीझेड’मध्ये बेकायदा उभारण्यात आलेल्या अन्य बांधकामांवरही    कारवाई करण्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित उप जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. पंचायत संचालकांनी फर्नांडिस यांना पंचायतराज कायद्याअंतर्गत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून उत्तर घ्यावे आणि त्यावर काय कारवाई करणार याची प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात आठवडाभरात  माहिती द्यावी., असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

 सर्व माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्या

हरमलच्या माजी सरपंचाच्या नातेवाईकांच्या बेकायदेशीर मालमत्तेची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीपर्यंत माहिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयने दिला आहे. त्यावेळी सर्व बेकायदा बांधकामांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचाही आदेश दिला आहे.

 बायको, मुले, बहीण, भाऊ, चुलते... अख्खं कुटुबं!

या प्रकरणी काल सोमवारी सुनावणी सुऊ असताना याच पंचायतीच्या अधिकारक्षेत्रात आणखी बेकायदेशीर बांधकामे असल्याचे उघड झाले. या बांधकामाची अधिक माहिती घेतली असता, अत्यंत धक्क्कादायक माहिती मिळाली. त्यात अधिकतर बांधकामे माजी सरपंच फर्नांडिस यांच्या पत्नी, भाऊ, बहिणी, चुलते तसेच अन्य नातेवाईकांची असल्याचे आढळून आले आहे. एवढेच नव्हे, तर या बांधकामांमधून चक्क हॉटेल, रेस्टॉरंट यांसारखे व्यवसायही सुरू असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयही आश्चर्यचकीत झाले. कुटुंबीय, नातेवाईक यांच्या नावावर नेमकी किती बांधकामे आहेत? याची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्रातून न्यायालयाला द्यावी आणि ही बांधकामे त्वरित हटवण्याची हमी फर्नांडिस यांच्याकडून घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article