महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साळावली धरणाच्या पाणीसाठ्यात यंदाही घट

06:12 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाण्याची पातळी 10.44 मीटरनी घटून 30.71 मीटरवर

Advertisement

प्रतिनिधी/ सांगे

Advertisement

दक्षिण गोव्यातील सांगे येथील साळावली धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा दरवर्षीप्रमाणे यंदाही घटला आहे. यावर्षी उष्मा प्रचंड वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील सर्वच धरणांच्या जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. दक्षिण गोव्याला पिण्याचे पाणी तसेच शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी 10.44 मीटरनी खाली आली असून सध्या ही पातळी 30.71 मीटर इतकी आहे.

वास्तविक दरवर्षी पाणीसाठ्यात घट येते. यंदाही ती आली आहे. परंतु त्याचा परिणाम होणार नाही. गेल्या वर्षी साळावली जलाशयातील पाण्याची पातळी 29.71  मीटर इतकी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत पातळी 1 मीटरने जास्त आहे. परिणामी पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जलस्रोत खात्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. साळावली नदीवर 1976 साली हे धरण बांधण्यास घेतले गेले. दक्षिण गोव्यातील सर्वांत महत्त्वाचा असा हा पाणी प्रकल्प असून मोठ्या प्रमाणावर तो शेतीला पाणीपुरवठा करतो तसेच वास्कोपर्यंतच्या जनतेची तहान भागवतो.

या जलाशयाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता (कमाल पातळी) 41.15 मीटर इतकी असून जलाशय सुमारे 24 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला आहे. या धरणाची लांबी 1004 मीटर इतकी आहे. या धरणावर लाखो ऊपयांचा चुराडा केला गेला, पण प्रत्यक्षात जमीन किती लागवडीखाली आली हे कोडेच आहे. वेर्णा औद्योगिक वसाहत व लहान-मोठ्या उद्योगांनाही हेच पाणी पुरविले जाते. साळावली धरणाच्या जलाशयातून सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत शेळपे येथून प्रतिदिन 160 एमएलडी इतके पाणी खेचून शुद्धिकरण करून जनतेला पिण्यासाठी पुरविले जाते.

शेतीसाठी दररोज 4 क्युमिक्स पाणीपुरवठा

शेतीसाठी सध्या धरणाच्या मुख्य कालव्यातून 4.00 क्युमिक्स (एक घन मीटर प्रति सेकंद) इतके पाणी दररोज सोडले जाते. सुऊवातीला लागवड जास्त असल्याने 10 क्युमिक्स सोडण्यात येते. यावर्षी कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यात खात्याला यश आले आहे. याशिवाय 100 एमएलडी पाणी जायका प्रकल्पासाठी वापरले जात असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच 40 एमएलडी पाणी काले नदीत सोडले जाते. सध्या एकच पंप चालू आहे.

ओपा नदीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी साळावलीचे पाणी जलवाहिनीद्वारे काले नदीत दरवर्षी सोडले जाते. याव्यतिरिक्त साळावलीचे पाणी वाडे, नायकाबांध येथे सोडण्यासाठी जलस्रोत खात्याने खास योजना तयार केली असून 40 एमएलडी पाणी सोडले जाते. परंतु हे पाणी मे महिन्यातच सोडले जाते. वाडे भागातील शेतीसाठी अपुऱ्या पडणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी हे पाणी वळविले जाते.

27 टक्के पाणीसाठा उपलब्ध

सध्या साळावलीच्या जलाशयात 27 टक्के पाणीसाठा म्हणजे 62.352 दशलक्ष क्युमिक्स पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 52.541 दशलक्ष क्युमिक्स इतका होता. एकंदरित सांगे भागात 159.33 इंच इतका पाऊस गेल्या वर्षी झाला होता. पावसाळ्यात साधारणपणे जुलै महिन्याच्या मध्यास जलाशय तुडुंब भरून वाहू लागतो. जलाशयातील पाण्याची पातळी 41.15 मीटरवर आली की, जलाशयाच्या मुखातून पाणी बाहेर पडू लागते.

सध्या धरणात 30.71 मीटर इतके पाणी असल्याने अजून 10.71 मीटर पाणी वापरता येणार आहे. एकदा का 20 मीटरच्या खाली पाण्याची पातळी गेली की, पाणी वापरणे कठीण होऊन बसते, असे जलस्रोत खात्याकडून समजले. धरणाच्या कालव्यातून देखील 20 मीटरपर्यंतच्या पातळीवरच पाणी सोडले जाते. साळावलीच्या पाण्यावर अजून 100 एमएलडी जलशुद्धिकरण प्रकल्प येणार असून त्याचे भूमिपूजन आभासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच केलेले आहे.  भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून योग्य नियोजन करण्याबरोबर कालव्यातून वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी जलस्रोत खात्याने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article