Sangli : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची 'वॉर रूम' प्रणाली यशस्वी
मनपा 'वॉर रूम'ची ऐतिहासिक कामगिरी
सांगली : शहर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने शहर विकासाच्या कामांना गती देण्यासाठी सुरू केलेली 'वॉर रूम' प्रणाली अत्यंत यशस्वी ठरत आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पांचा दर १५ दिवसांनी आढावा घेऊन जहवळे तत्काळ दूर केले जातात सुरक्षितता, सुविधामाधवनगर रोड फायर स्टेशन, हनुमाननगर माजी मंडई, शहर सुशोभीकरण, काळी खण सुशोभीकरण स्मार्ट गव्हर्नन्स हे सर्व प्रकल्प बेट नागरिक सेवेत दाखल झाले असून शहराच्या जीवनमानात सकारात्मक वाढ घडवत आहेत.
सध्या प्रगतीपथावर असलेले १५ महत्वाचे प्रकल्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हनुमाननगर अग्रिशमन केंद, खाऊ गल्ली, गव्हर्मेंट कॉलनी शामनगर बॉटर टैंक रमाई उद्यान जलमंदि प्रतापसिंह उद्यान पक्षी संग्रहालय, चैत्रबन नाला प्रकल्प फिश मार्केट ही कामे प्रस्तावित आहेत या प्रकल्पांमुळे शहराच्या आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहे.
वॉर रूम ही सांगली-मिरज कुपवाड शहराचा विकास वेगवान आणि दर्जेदार करण्याची गुरुकिल्लीआहे. दर पंधरा दिवसांनी प्रकल्पांचा आढावा घेतल्याने अडवळे त्वरित दूर होतात आणि कामांना निश्चित गती मिळते. मिशन ७' प्रकल्पांचा नागरिकांच्या जीवनमानावर ठोस सकारात्मक परिणाम होईल." असे आयुक्त सत्यम गांधी, यांनी सांगितले. वॉर रूमच्या प्रभावी मॉनिटरिंगमुळे पायाभूत सुविधा आरोग्य सेवा कचरा व्यवस्थापन पर्यावरण संवर्धन डिजिटल गव्हर्नन्स नागरी सेवा या सर्व क्षेत्रांतील प्रकल्पांना अभूतपूर्व गती मिळत असून, शहर एका आधुनिक, कार्यक्षम आणि विकसित महानगराकडे वाटचाल करीत असून त्यामुळे बकालपणा दूर होणार आहे.