सीमावासियांचा आवाज शिवाजी पार्क येथे घुमला
12:29 PM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बेळगावमधील कार्यकर्ते पोहोचले होते. सोमवारी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे स्मृतीस्थळावर येताच बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यामुळे शिवाजी पार्क परिसरात सीमावासियांचा आवाज घुमला.वडगाव येथील कार्यकर्ते राजू मण्णूरकर व अजित जुवेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सीमाप्रश्नासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कार्यकर्त्यांनी उजाळा दिला.
Advertisement
Advertisement