For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भेडशी पुलाचे काम कासवाच्या गतीने !

03:02 PM Jan 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
भेडशी पुलाचे काम कासवाच्या गतीने
Advertisement

सा. बां विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विचारला जाब

Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

धीम्या गतीने व अपूर्ण असलेल्या भेडशी पुलाच्या कामाबाबत सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना येथील ग्रामस्थांनी जाब विचारत संबंधित ठेकेदार व सा. बां. विभागाचे अधिकारी यांची पुलाच्या ठिकाणी चर्चा घडवून काम सुरू करण्याची डेडलाईन जाहीर करण्यास भाग पाडले.दोडामार्ग विजघर राज्य मार्गावरील भेडशी येथील महत्त्वाच्या पुलाचे काम सुरू होऊन वर्ष उलटत आले तरी पुलाचे अंतिम काम पूर्ण झाले नाही. तर हे काम करताना सबंधित ठेकेदाराकडून धीम्या गतीने पुलाचे काम सुरू आहे.तर काही दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदार हे काम अर्धवट टाकून गेला होता. यामुळे अपूर्ण असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक, प्रवासी , ग्रामस्थ यांना येथील होणाऱ्या धुळीचा, ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळेच भेडशीतील ग्रामस्थ आणि युवासेना पदाधिकारी विष्णु (बाबू) मुंज, निखिल जुवेकर,माजी उपसरपंच गणपत डांगी यांनी दोडामार्ग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात धडक देत भेडशी पुलाच्या धीम्या गतीने सुरू असलेल्या व अपूर्ण असलेल्या कामाबाबत सहा. अभियंता संभाजी घंटे यांना जाब विचारला.व येत्या आठवडाभरात कामास सुरुवात न केल्यास अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलावरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्यावर श्री. घंटे यांनी तात्काळ ठेकेदार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र यावेळी उपस्थित ग्रामस्थ यांनी ठेकेदार व सा. बां. विभागाचे अधिकारी यांनी पुलाच्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी व अपूर्ण कामाबाबत माहिती द्यावी असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर काही तासांतच ठेकेदार व अधिकारी भेडशी पुलावर हजर राहत ग्रामस्थांशी चर्चा केली. अपूर्ण असलेल्या कामाबाबत व यामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल जाब विचारला.यानंतर पुढे झालेल्या चर्चेत दि.8 पासून पुन्हा काम हाती घेतले जाईल व ठराविक कार्यकाळात काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन ग्रामस्थ, ठेकेदार व अधिकारी यांच्यात भेडशी पुलावर झालेल्या संयुक्तिक चर्चेत दिले.यावेळी शिवदास मणेरकर, नंदकिशोर टोपले,वासुदेव(दादा) महाजन, गौरीश वेटे, विष्णू मुंज, गोपाळ गवस,गणपत डांगी, निखिल जुवेकर, शुभम मणेरकर, सहा. अभियंता संभाजी घंटे, ठेकेदार श्री. नार्वेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.