For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईमध्ये धुळीचे वादळ...दोन ठिकाणचे होर्डींग्ज पडले...बचावकार्य सुरू

08:04 PM May 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
मुंबईमध्ये धुळीचे वादळ   दोन ठिकाणचे होर्डींग्ज पडले   बचावकार्य सुरू
Mumbai Dust storm
Advertisement

मुंबईच्या काही भागांमध्ये, विजांच्या कडकडाटासह आणि मध्यम पावसासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. जोरदार वाऱ्यांमुळे दादरसह आसपासच्या परिसरामध्ये धुळीच्या वादळ निर्माण होऊन अंधुक वातावरणाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईच्या पूर्व आणि उत्तर भागात जवळपास पाऊणतास मुसळधार पाऊस पडला.

Advertisement

सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे आणि पालघरच्या आसपासच्या भागांना पावसाने झोडपून काढले. यामध्ये ठाणे, पालघर तसेच मुंबईची पूर्व उपनगरे मुलुंड, टिटवाळा आणि कल्याण हा परिसर सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

मुंबईमधील वडाळाच्या पूर्वेला धुळीच्या वादळामुळे तसेच सोसाट्याच्या वादळासह मुसळधार पावसामुळे एका इमारतीवरील होर्डिंग्ज कोसळले. यामध्ये किमान सात जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भातील व्हिडीयो व्हायरल झाला आहे.

Advertisement

दुसऱ्या एका घटनेत, मुंबईच्या घाटकोपर पूर्व येथील एका पेट्रोल पंपावर एक महाकाय होर्डिंग जमिनदोस्त झाले असून यात किमान सात जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अजूनही काही लोक होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात शोध आणि बचाव कार्य जोरात सुरू आहे.

Advertisement
Tags :

.