महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधान परिषदेत महायुतीची बाजी

06:43 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महायुतीचे 9 उमदेवार जिंकले : महाविकास आघाडीला धक्का

Advertisement

प्रतिनिधी, मुंबई :

Advertisement

लोकसभेच्या निकालानंतर विधान परिषदेच्या निवडणूक निकालावरही परिणाम होऊन महायुतीला धोका पोहोचण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत असतानाच प्रत्यक्षात विधान परिषद निवडणूक निकालात महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाल्याने त्यांचा विजय शंभर टक्के झाल्याचे स्पष्ट झाले. महायुतीचे आठ उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी झाले, तर नववा उमेदवार सदाभाऊ खोत दुस़ऱ्या फेरीची 12 मते घेऊन विजयी झाले. या शंभर टक्के विजयामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक विनबिरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. 11 जागांसाठी 11 उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या रूपाने बारावा उमेदवार उभा केल्याने निवडणूक निश्चित ठरली. आणि ख़ऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंगत आली. शेवटी मिलिंद नार्वेकर विजयी झाले, पण दुस़ऱ्या पसंतीचे मत घेऊन. पहिल्या फेरीत त्यांना 22 मते मिळाली. तर  दुस़ऱ्या पसंतीचे 3 मते  घेऊन ते विजयी झाले.

निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी काल आमदारांना हॉटेलमध्ये बंदिस्त करण्यात आले होते. हॉटेल डिप्लोमसी खेळण्यात आली होती. मात्र हे मतदान गुप्त पद्धतीने असल्याने त्यांच्या मतांवर कोणीही निर्बंध घालू शकत नव्हते. आणि तसेच झाले. या निवडमुकीत शिवसेना ठाकरे गटाची दोन आणि काँग्रेसची दोन मते फुटल्याचे सांगण्यात येत आहेत.

शरद पवार गटाला धक्का

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतफत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला खो दिला आहे. मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महायुतीने महाविकास आघाडीची मते पळवली आहेत.

शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का

या निवडणुकीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला, त्यांना अवघी 12 मते मिळाली. त्यांना आठ मते मिळताच आपले भविष्य ओळखून त्यांनी मतमोजणी पेंद्र सोडले आणि अखेर तसेच झाले व त्यांचा पराभव झाला.

अजित पवारांनी काँग्रेसची 5 मते फोडली

निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाकडे 42 मते होती. पण अजित पवार गटाला 47 मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची 5 मते फोडण्यात अजित पवार गटाला यश मिळाले.

पुरेसा कोटा असूनही विजयासाठी संघर्ष

काँग्रेसने या निवडणुकीत 1 उमेदवार दिला होता. हा उमेदवार जिंकण्यासाठी 23 मतांची आवश्यकता होती. पण काँग्रेसकडे हक्काची 38 मते होती. तरीही त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचादेखील विजय झाला. योगेश टिळेकर यांच्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या विजयी ठरल्या. त्यानंतर भाजपचेच उमेदवार परिणय फुके हे विजयी झाले. तर भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांचा निकाल रखडला होता. मात्र दुसऱ्या पसंतीची मते घेऊन ते विजयी झाले.

पंकजा मुंडे यांचा वनवास संपला

2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकारण संपलेय की काय, अशी चर्चा होती. पण भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट दिले. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा गेल्या पाच वर्पचा राजकीय वनवास संपला. पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळवला ा

परळीत फटाक्यांची आतषबाजी

पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीडच्या परळी येथील यशश्री निवासस्थानी मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मुंडे समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

भाजपचे विजयी उमेदवार

1) पंकजा मुंडे - 26 मते

2) परिणय फुके -  26 मते

3) सदाभाऊ खोत -  26 मते

4) अमित गोरखे -  26 मते

5) योगेश टिळेकर -  26 मते

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार

1) शिवाजीराव गर्जे -  23 मते

2) राजेश विटेकर -  24 मते

शिवसेना विजयी उमेदवार

1) कृपाल तुमाने -  25 मते

2) भावना गवळी -   24 मते

काँग्रेसच्या विजयी उमेदवार

1) प्रज्ञा सातव -  25 मते

शिवसेना ठाकरे गट

1) मिलिंद नार्वेकर -  24 मते

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार

1) जयंत पाटील (शेकाप) -  12 मते

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article