महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वीरशैव लिंगायत माळी समाजाचा कोल्हापुरात दहा डिसेंबरला वधूवर पालक मेळावा

11:41 AM Dec 02, 2023 IST | DHANANJAY SHETAKE
December 2, 2023 97 KB 940 by 433 pixels
Advertisement

वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्यावतीने रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी समाज व वधू-वर पालक मेळावा होणार आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे सकाळी साडे दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

या मेळाव्याचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते होणार असून, पुरस्कार वितरण समारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. यावर्षी जीवन गौरव पुरस्कार सदाशिव बुबणे तर समाजभूषण पुरस्कार युवराज माळी यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ हे भुषविणार आहेत.

Advertisement

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक जयंत पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरगी, बसव केंद्र कोल्हापूरचे अध्यक्ष राजशेखर तंबाखे, डॉक्टर बी. आर. कोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला समस्त वीरशैव लिंगायत माळी समाज बांधव उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे

Advertisement
Tags :
#tarunbharat#vadhuvar #belaum #maraage
Next Article