कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संयुक्त राष्ट्राने घटवला भारताचा जीडीपी दर

06:04 AM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आर्थिक वर्ष 2025 करीता 6.3 टक्के अंदाज: अर्थव्यवस्था योग्य दिशेने

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संयुक्त राष्ट्राने भारताच्या जीडीपी विकासामध्ये घसरणीचा कल दर्शवला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.3 टक्के विकसित राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

संयुक्त राष्ट्राने म्हटलेले आहे की भारत सध्याचा जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी आघाडीवरचा देश असून 2025 करता आर्थिक विकास हा 6.3 टक्के इतका राहणार आहे. असं जरी असलं तरी भारताची विक्रीतील कामगिरी चांगली राहणार असून सरकारी खर्च केल्यामुळे अर्थव्यवस्थेला तेजीचे सहकार्य कायम राहणार आहे. एका अहवालामध्ये संयुक्त राष्ट्राने या संदर्भातली माहिती दिली आहे.

वाढता व्यापार तणाव

2024 मध्ये भारताचा जीडीपी दर 7.1 टक्के इतका होता. देशांतर्गत खपाच्या बाबतीमध्ये आणि सार्वजनिक गुंतवणुकीच्या बाबतीत भारत हा आजही मजबूत देश असून देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढताना दिसते आहे. जागतिक अर्थव्यवस्था ही एका नाजूक वळणावर असल्यामुळे भारताच्या जीडीपी दराच्या अंदाजात काहीशी कपात केलेली आहे. वाढता व्यापार तणाव आणि धोरणात्मक दृष्ट्या स्पष्टता नसल्याचे वातावरण जगभरात पाहायला मिळते आहे. अमेरिकेकडून शुल्क आकारणीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन खर्चामध्ये वाढीचे वातावरण जागतिक स्तरावर पाहायला मिळत असून पुरवठा साखळी सध्याला बाधित होण्याच्या स्थितीत आली आहे.

देशांतर्गत मागणी कायम राहणार

या सर्व पार्श्वभूमीवर भारताचा विचार करता देशांतर्गत मागणी चांगली राहणार असून सार्वजनिक गुंतवणूकदेखील चांगली होत आहे. सेवा निर्यातीचे चांगले प्रमाण हे अर्थव्यवस्थेला उभारी देत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article