महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुचाकी चोरणारे रेकॉर्डवरील दोघे अटकेत! सहा दुचाकी जप्त

06:27 PM Sep 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तिघा पैकी दोघांना अटक केली. ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील (वय 25, रा. राधानगरी), अक्षय चंद्रकांत पाटील (वय 29, रा. शिरगाव, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार ऊपये किंमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. अटकेतील दोघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर पोलिसांची चाहुल लागताच या दोघाचा साथिदार सुहास नामदेव चव्हाण (रा. राधानगरी) हा राहत्या घरातून पळून गेला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.

Advertisement

पोलीस निरीक्षक कळमकर म्हणाले, जिह्यात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांची गांभीर्याने दखल घेवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना सक्त आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे अन्य पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील पोलीस अंमलदार बालाजी पाटील आणि सतीश जंगम यांना दोन तऊण दिंडनेर्ली फाटा (ता. करवीर) येथे विकण्यासाठी येणार आहे. अशी माहिती त्यांना बातमीदाराकडून मिळाली. त्या माहितीवऊन दिंडनेर्ली फाट्यानजीक सापळा लावला. यावेळी पोलिसांना नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवऊन दोन तऊण येत असलेले दिसून आल्याने, संशयावऊन त्यांची दुचाकी अडविली. त्यांच्याकडे वाहन चालविण्याच्या परवानासह दुचाकीच्या कागदपत्राची चौकशी केली. चौकशी दरम्यान दोघेही उडवा-उडवीची उत्तरे देवू लागले. त्यामुळे या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये दोघांनी वापर असलेल्या दुचाकीसह अन्य चोरीच्या पाच दुचाकी राहत्या घरानजीक लपवून ठेवल्या आहे. तसेच या सर्व दुचाकी चोरीमध्ये साथिदार सुहास नामदेव चव्हाण (रा. राधानगरी) हा साथिदार देखील सहभाग असल्याचे सांगितले. त्यावऊन पोलिसांनी या दोघांना अटक करीत, त्यांच्याकडून चोरीच्या 1 लाख 30 हजार ऊपये किंमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. त्यानंतर पोलिसानीं त्यांचा साथिदार सुहास चव्हाण याला पकडण्यासाठी त्यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. पण पोलिसांची चाहुल तो घरातून पळून गेला.

Advertisement

चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या दुचाकी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना दुचाकी चोरणाऱ्या राधानगरी तालुक्यातील तिघापैकी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी अटकेतील दोघासह त्यांचा पसार साथिदाराने मिळून जिह्यातील गोकूळ शिरगाव, इस्फुर्ली, शाहुवाडी आणि पंढरपूर शहर या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.

Advertisement
Next Article