अमेरिकेत फैलावतोय ‘ट्रिपल ई’ मॉसक्टो व्हायरस
अमेरिकेत यंदा डासांमुळे फैलावणाऱ्या दुर्लभ विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना न्यू हॅम्पशायर येथील आहे. तेथे मागील एक दशकात असे प्रकरण घडले नव्हते. अमेरिकेत यंदा ट्रिपल ई व्हायरसच्या संक्रमणाचे पाच रुग्ण सापडले आहेत. हा विषाणू अत्यंत दुर्लभ परंतु जीवघेणा आहे.
न्यू हॅम्पशायर, मॅसाच्युसेट्स समवेत आसपासच्या प्रांतांमध्ये डासांमुळे ट्रिपल ई व्हायरसचे संक्रमण फैलावलेले आहे. या प्रांतांना आता हाय अलर्ट देण्यात आला आहे.
ट्रिपल ई व्हायरस
ईईईव्ही म्हणजेच ईस्टर्न एक्विन इंसेफलायटिस व्हायरसला लोक ट्रिपल ई या नावाने संबोधितात. 1938 मध्ये शोधण्यात आलेल्या या विषाणूचे संक्रमण अत्यंत दुर्लभ परंतु धोकादायक आहे. तेव्हापासून आतापर्यंत न्यू हॅम्पशायरमध्ये 118 लोक संक्रमित झाले आहेत. यामुळे आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला आहे. माणसांमध्ये हा विषाणू सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर आक्रमण करते, यामुळे मेंदूला सूज येते, वेदना होऊ लागते.
कुठे मिळाला होता विषाणू?
हा विषाणू उत्तर अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये मिळाला होता. अमेरिकेत सर्वप्रथम पूर्व आणि खाडीच्या किनारी राज्यांमधील लोकांमध्ये याचे संक्रमण आढळून आले. येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या असोसिएशट रिसर्च सायंटिस्ट वेरिटी हिल यांनी अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमधून डासांमध्ये येत हा विषाणू माणसांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले आहे. या विषाणूला सर्वसाधारणपणे ब्लॅक-टेल्ड मॉसक्वीटो घेऊन फिरतो. बहुतांश करून पूर्व अमेरिका, मेक्सिको आणि कॅरेबियनमध्येच याचे रुग्ण आढळून येतात.
कसा होतो फैलाव
जंगलांमध्ये चिखलात राहणारे किंवा प्रवास करणाऱ्या पक्ष्यांच्या वेगवेगवेळ्या प्रजातींमध्ये हा विषाणू आढळतो. डासांच्या काही प्रजाती माणूस आणि सस्तन प्राण्यांना ट्रिपल ई व्हायरसने संक्रमित करतात. हे डास संक्रमित पक्ष्यांचा चावा घेतात, तेथून रक्तासाब्sात विषाणूचे वहन करतात आणि मग माणसांमध्ये इंजेक्ट करतात. पक्ष्यांच्या तुलनेत माणूस आणि अश्व या विषाणूचे डेड-एंड होस्ट असतात. म्हणजेच यानंतर विषाणू अन्य कुणापर्यंत पोहोचत नाही. ट्रिपल ई विषाणूने संक्रमित होणाऱ्या माणसांमध्ये ताप, डोकेदुखी, उलटी होणे, डायरिया, सीजर अटॅक, वर्तनात बदल, थकवा, झोप येणे, लक्ष विचलित होणे, गंभीर अवस्थेत मेंदूला सूज येते, ज्याला इंसेफलायटिस म्हटले जाते. याचे निदान करण्यासाठी लक्षणे पाहिली जातात किंवा कण्याच्या हाडातील मॅरो आणि रक्ताची तपासणी केली जाते. त्यात अँटीबॉडीज असतील तर संबंधिताला संक्रमित मानले जाते.
आतापर्यंत किती रुग्ण
अमेरिकेत यंदा आतापर्यंत 5 रुग्ण सपाडले असून मॅसाच्युसेट्स, न्यूजर्सी, वरमॉन्ट, विसकॉन्सिन आणि न्यू हॅम्पशायरमध्ये याचा फैलाव झाला आहे. यंदा आतापर्यत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ट्रिपल ई व्हायरस माणसांमध्ये कमीच आढळून येतो. 2003-23 पर्यंत अमेरिकेत 196 रुग्ण आढळून आले आहेत. दरवर्षी याचे सुमारे 11 रुग्ण समोर येतात.