थर्माकोलचे तुकडे खाण्याचा ट्रेंड
सोशल मीडियावर शेकडो व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर चित्रविचित्र ट्रेंड येत असतात, यात वेगवेगळे चॅलेंज देण्यात येते, कधी एखाद्या एक्सरसाइजचा चॅलेंज तर कधी तिखट मिरची खाण्याचा ट्रेंड यामुळे निर्माण होतो. असाच एक अजब ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या खास ट्रेंडमध्ये लोक पॅकिंग पीनट्स खात आहेत. अनेक लोक या पॅकिंग आयटम्सना खातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. कुठल्याही सामग्रीला पॅक करताना ते तुटण्या-फुटण्यापासून वाचविण्यासाठी बबल पेपर किंवा काही थर्माकोलचे तुकडे वापरण्यात येतात. यामुळे सामग्रीला कुठलेही नुकसान पोहोचत नाही. या कामात अनेक लोक प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या काही तुकड्यांचा किंवा गोळ्यांचा वापर करतात. त्यांनाच पॅकिंग पीनट म्हटले जाते.
आता नव्या ट्रेंडनुसार लोक या पॅकिंग पीनट्सना खातानाचा स्वत:चा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या पॅकिंग पीनट्सना स्नॅक्स म्हणून खाल्लेही जाऊ शकते असे अनेक लोकांचे सांगणे आहे. जर रात्री भूक लागली तर हे खाल्ले जाऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. काही पॅकिंग पीनट्स बायोडिग्रेडेबल असतात, ज्यांना खाल्ले जाऊ शकते. ते तोंडात टाकताच विरळून जातात आणि शरीराला कुठलेच नुकसान पोहोचवित नाहीत असा दावा करण्यात येत आहे. याच्याशी निगडित काही व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत, ज्यात या पीनट्सवर पाणी ओतताच ते विरघळताना दिसून येते, आता पॅकिंग पीनट्स विरघळत असल्याचे लोक मानत आहेत.
तज्ञांचे काय सांगणे?
सोशल मीडियाच्या या ट्रेंडवरून काही तज्ञांचे जर हे पीनट्स बायोडिग्रेडेबल असल्यास ते खाल्ले जाऊ शकतात असा अर्थ होत नसल्याचे सांगणे आहे. हे पीनट्स आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. सर्व पॅकिंग पीनट्स एकसारखे नसतात. प्रत्यक्षात यातील बहुतांश पॅकिंग पीनट्स अद्याप स्टायरोफोमद्वारे निर्माण केलेले असतात जे खाता येत नाहीत. एका अहवालात नॅशनल कॅपिटल पॉइजन सेंटरचा दाखला देत स्टायरोफोम विषारी नसले तरीही शरीरात ते पचनतंत्रातून जात आतड्यांमध्ये अडकून पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले गेले आहे. पॅकिंग पीनट्स बायोडिग्रेडेबल असले तरीही खाण्यायोग्य आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगण्यात आले.