कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पिरनवाडी, रामदेव गल्ली कॉर्नर येथील ट्रान्स्फॉर्मर बनला धोकादायक

11:22 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

पिरनवाडी येथील रामदेव गल्ली कॉर्नर येथे धोकादायक अवस्थेत ट्रान्स्फॉर्मर आहे. या ट्रान्स्फॉर्मरबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले आहे. हा ट्रान्स्फॉर्मर कधीही बाजूला असलेल्या दुकानांवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात यावा, अन्यथा त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. गल्लीच्या प्रवेशद्वारावरच ट्रान्स्फॉर्मर बसवलेला आहे. मात्र बाजूलाच असलेल्या दुकानच्या भिंतीला लागून सदर ट्रान्स्फॉर्मरच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. यामुळे आजूबाजूच्या दुकानांना याचा धोका निर्माण झालेला आहे. रामदेव गल्ली कॉर्नर येथील ट्रान्स्फार्मर असलेल्या रस्त्यावरून रोज वाहनधारकांची वर्दळ असते. या गल्लीत श्री राम मंदिर आहे. गल्लीच्या कॉर्नरवर ट्रान्स्फार्मर बसवलेला आहे. यापूर्वी तीनवेळा निवेदन दिले आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याची पाहणी करून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी भरत मेणसे यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article