महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बदल्यांवरून पुन्हा घमासान

06:19 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हायरल व्हिडिओनंतर 48 तासांत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : कुमारस्वामींकडून सरकारवर हल्लाबोल

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र, माजी आमदार डॉ. यतिंद्र यांचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. या आरोपानंतर काही तासातच राज्य सरकारने 71 पोलीस निरीक्षक आणि 40 डीवायएसपींच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून पुन्हा एकदा निजद आणि भाजपने काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर काँग्रेस नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

तीन दिवसांपूर्वी यतिंद्र सिद्धरामय्या हे आपल्या वडिलांशी फोनवरून संभाषण करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून भाजप आणि निजद नेत्यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. सदर संभाषणामध्ये विवेकानंद या नावाचा उल्लेख यतिंद्र यांनी केला होता. आता विवेकानंद नामक पोलीस निरीक्षकाची बदली झाली असून राज्य गुप्तचर विभागातून म्हैसूर शहरच्या व्ही. व्ही. पुरम पोलीस स्थानकात नेमणूक झाली आहे. यतिंद्र यांच्या व्हिडिओमध्ये उल्लेख असणारे विवेकानंद हेच का?, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

यतिंद्र यांचा कारनामा बदल्यांच्या यादीतील चौथ्या ओळीत

डॉ. यतिंद्र यांचा व्हिडिओ व्हयरल झाल्यानंतर 48 तासांत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या यादीत व्हिडिओमध्ये उल्लेख असलेल्या नावाचा समावेश असल्याविषयी निजद नेते कुमारस्वामी यांनी ट्विटवर उल्लेख केला आहे. व्हिडिओमध्ये उल्लेख नावाचा उल्लेख असलेल्या विवेकानंद यांची गुप्तचर विभागातून म्हैसूरच्या व्ही. व्ही. पुरम पोलीस स्थानकात कशी बदली झाली याविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर द्यावे. राज्यात बदल्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे यतिंद्र यांचा व्हिडिओ हाच पुरावा आहे. मुलावरील आरोप फेटाळणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या पुत्राचा कारनामा 71 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चौथ्या ओळीतच लपला आहे, अशी टिकाही कुमारस्वामी यांनी केली आहे.

निवृत्तीची तारीखही कळवावी : ए. नारायणस्वामी

राज्यात बदल्यांमध्ये गैरव्यवहार करीत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सिद्धरामय्या यांनी आता निवृत्तीची तारीख देखील कळवावी, अशी टोला भाजपच्या राज्य एससी मोर्चाचे अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य चलवादी नारायणस्वामी केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यापासून अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहे. बदल्यांच्या कामासाठी यतिंद्र यांना नेमण्यात आले आहे. यापूर्वीच आपण हे सांगितले होते. व्हायरल व्हिडिओविषयी सिद्धरामय्या यांनी विरोधी पक्षातील नेते खोटे आरोप करत असल्याचे म्हटले होते. त्यांनी व्हिडिओ बदल्यांशी संबंधित असल्याचे सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेणार असल्याचे आव्हान दिले होते. आता तुम्ही शब्दाचा मान राखणार का, हे राज्यातील जनतेला समजेल, अशी टिकाही नारायणस्वामी यांनी केली.

खोटे आरोप करणे अशोभनीय : डी. के. शिवकुमार

कुमारस्वामी हे माजी मुख्यमंत्री आहेत. ते दोनवेळा मुख्यमंत्री बनले आहेत. निजदचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. त्यांना मोठा मान आहे. त्यानुसार त्यांचे वर्तन असले पाहिजे. दिवस उजाडताच सरकारवर खोटे आरोप करणे त्यांना शोभत नाही, अशी खोचक टिप्पणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. कुमारस्वामी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र हे आता पार्टनर आहेत. त्यांच्यामध्येच गोंधळ असताना आपणी कशी प्रतिक्रिया देणार? डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी वडिलांसाठी मतदारसंघाचा त्याग केला आहे. आमदार नसताना देखील ते जनहिताची कामे करत आहेत. हे पाहून समाधान व्यक्त करण्याऐवजी खोटे आरोप करणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

विवेकानंद म्हैसूर ग्रामीणचे गटशिक्षणाधिकारी : सिद्धरामय्या

डॉ. यतिंद्र यांच्याशी संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नावाचा उल्लेख असणारे विवेकानंद हे म्हैसूर ग्रामीणचे गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यांच्याविषयीच आमच्यात संभाषण झाले होते. कुमारस्वामी यांनी सांगितलेल्या पोलीस अधिकारी विवेकानंद यांच्याविषयी नव्हे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहे. पोलीस अधिकारी विवेकानंद यांची चामराजनगरमध्ये बदली झाली आहे. त्या मतदारसंघाचे आमदार हरिषगौडा यांना विवेकानंद हे कोण आहेत, याविषयी कुमारस्वामींनी विचारणा करावी. कुमारस्वामी यांनी सत्य जाणून घेऊनच भाष्य केल्यास उत्तम, असे प्रत्युत्तर सिद्धरामय्या यांनी दिले.

आमदारांनाच विचारा : डॉ. यतिंद्र

व्हायरल व्हिडिओमध्ये मी उल्लेख केलेले विवेकानंद कोण, हे मला आताही ठाऊक नाही. विवेकानंद कोण?, कोणत्या विवेकानंदांची कोठे बदली झाली?, याविषयी मला माहित नाही. त्या मतदारसंघातील आमदारांनाच विचारून जाणून घ्या, अशी प्रतिक्रिया डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आरोप करणाऱ्यांनी पुरावे समोर ठेवून बोलावे. विनाकारण आपले नाव पुढे आणले जात आहे, असेही ते म्हणाले.

बेळगाव अधिवेशनात आवाज उठवणार!

अधिकाऱ्यांच्या बदऱ्यांमध्ये गैरव्यवहार होत असून याविषयी आपण गप्प बसणार नाही. व्हायरल व्हिडिओ हाच पुरावा असून बेळगावमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात आपण आवाज उठविणार आहे.

- एच. डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article