‘द फर्स्ट ओमेन’चा ट्रेलर सादर
हॉररपट ‘द फर्स्ट ओमेन’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून चित्रपट किती भीतीदायक असू शकतो याचा अंदाज बांधता येतो. हॉररपटाच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक पर्वणीच ठरेल. ट्रेलरची सुरुवात एका चर्चसारख्या ठिकाणातून होते, जेथे एक मुलगी बाल्कनीत उभी दिसून येते, या मुलीला पाहून अन्य मुली घाबरलेल्या दिसून येतात, पुढील दृश्यात मागून ‘तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, ईश्वराने तुमच्यासाठी बरेच काही ठरविले आहे’ असा आवाज ऐकू येतो. द फर्स्ट ओमेन हा 1976 मध्ये प्रदर्शित ‘द ओमेन’ चित्रपटाचा प्रीक्वेल आहे. हा चित्रपट मागील चित्रपटापेक्षा अधिक भीतीदायक असेल. ‘द फर्स्ट ओमेन’चे दिग्दर्शन अरकाशा स्टीवेन्सन यांनी केले आहे. अरकाशा यांनी मोठ्या पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे भय आणि अंधकार चित्रित केला आहे. ‘द फर्स्ट ओमेन’ हा चित्रपट चालू वर्षातील सर्वात प्रभावी हॉररपट ठरणार असल्याचे मानले जात आहे. हॉरर आणि रहस्यमय चित्रपटांचे चाहते असलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट निश्चितच आवडणार आहे. ‘द फर्स्ट ओमेन’ हा चित्रपट 5 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.