For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’चा ट्रेलर सादर

06:46 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’चा ट्रेलर सादर
Advertisement

प्राइम व्हिडिओने डोनाल्ड ग्लोवर आणि माया एर्स्किन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’ या सीरिजचा ट्रेलर जारी केला आहे. सीरिजचे सर्व एपिसोड्स 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहेत. या सीरिजमध्ये दोन अनोळखी व्यक्ती एका रहस्यमय हेरयंत्रणेसाठी काम करत असल्याचे दाखविण्यात येणार आहे.

Advertisement

याच नावाने 2005 साली प्रदर्शित चित्रपटावर ही सीरिज बेतलेली आहे. चित्रपटात ब्रॅड पिट आणि एंजेलिना जोलीने मुख्य भूमिका साकारली होती. ‘स्मिथना भेटा, दोन अनोळखी-जॉन आणि जेन, ज्यांनी हेरगिरी आणि विवाह दोन्हींमध्ये एकत्र भागीदार होण्यासाठी स्वत:चे जीवन आणि ओळख त्यागली आहे’ असे सीरिजच्या तपशीलात नमूद आहे. ही सीरिज 2 फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. अभिनयासोबत ग्लोवरने या सीरिजची निर्मिती देखील केली आहे. ग्लोवर आणि एर्स्किनसोबत या सीरिजमध्ये पार्कर पोसी, वॅगनर मॉरा, मिशेला कोल, जॉन टर्टूरो आणि पॉल डानो हे कलाकार दिसून येणार आहेत. हिरो मुराई हे पहिल्या दोन एपिसोड्सचे दिग्दर्शक आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.