महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मडगांव एक्सप्रेस’चा ट्रेलर सादर

06:22 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

3 मित्रांच्या गोवा ट्रिपची मजेशीर कहाणी

Advertisement

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी आगामी काळात प्रेक्षकांकरता विनोदाची पेरणी करणार आहेत. या दोघांकडून ‘मडगांव एक्सप्रेस’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून तो विनोदाने नटलेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात प्रतीक गांधी, दिव्येंद्र शर्मा आणि अविनाश तिवारी यांच्या गोवा ट्रिपची मजेशीर कहाणी दाखविण्यात आली आहे.

Advertisement

या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल खेमूने केले आहे. कुणालने याद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. कॉमिक पंचला

इन आणि खुमासदार संवाद या चित्रपटाची वैशिष्ट्यो आहेत. दिग्गज अभिनेत्यांसोबत या चित्रपटात नोरा फतेही ही अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत आहे.

हा चित्रपट 22 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यावर या चित्रपटासाठी चाहत्यांच्या उत्सुकता वाढल्या आहेत. कुणाल खेमूने स्वत:च्या दिग्दर्शनाची क्षमता या चित्रपटाद्वारे दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article