For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘खेल खेल में’चा ट्रेलर सादर

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘खेल खेल में’चा ट्रेलर सादर
Advertisement

अक्षय कुमार, एमी विर्क, तापसी पन्नू आणि वाणी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘खेल खेल में’ 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेक कलाकारांनी नटलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. याचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. 2016 मध्ये प्रदर्शित इंग्रजी चित्रपट ‘परफेक्ट स्टेंजर्स’चा हा हिंदी रिमेक आहे. सर्व मित्र परस्परांना भेटतात आणि पार्टी करण्याचा निर्णय घेतात, सर्वजण एकत्र जमताच एक गेम खेळण्याचा निर्णय घेतात, या गेमनुसार सर्वांना स्वत:चा मोबाइल अनलॉक करायचा असतो आणि तो सर्वांसमोर टेबलवर ठेवावा लागतो. याचदम्यान ज्या व्यक्तीच्या फोनवर कॉल किंवा मेसेज येईल तो त्याने सर्वांसमोर वाचावा किंवा रिसिव्ह करावा असे ठरते. गेममध्ये अनेक लोकांचे दडविलेले रहस्य खुले होण्याची भीती असते असे या ट्रेलरमध्ये दिसून येते.  चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजने केली आहे. फरदीन खान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतणार आहे. फरदीन यापूर्वी वेबसीरिज ‘हीरामंडी’मध्ये दिसून आला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.