For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तृप्ति डिमरीला मिळाला बायोपिक

06:03 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
तृप्ति डिमरीला मिळाला बायोपिक
Advertisement

परवीन बाबीची भूमिका साकारणार

Advertisement

अॅनिमल चित्रपटामुळे मिळालेल्या यशानंतर तृप्ति डिमरीकडे चित्रपटांची रांग लागली आहे. तृप्ति आता एका बायोपिकमध्ये दिसून येणार आहे. हा बायोपिक बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्री परवीन बाबीचा असणार आहे. परवीन बाबीच्या महेश भट्टसोबतच्या अफेयरची चर्चा आजही होते.

तृप्ति डिमरी ही परवीन  बाबी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.  तर दिग्दर्शक आणि अन्य कलाकारांची अद्याप निवड करण्यात आलेली नाही. परवीन बाबीचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी जूनागढ गुजरात येथे झाला होता. परवीन यांनी अहमदाबाद येथे स्वत:चे शिक्षण पूर्ण केले होते. 1972 मध्ये त्यांनी मॉडेलिंग सुरू केले तर 1973 मध्ये चरित्र या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला तरीही परवीन यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परवीन यांना अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ चित्रपटाद्वारे मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

Advertisement

परवीन या चित्रपटांपेक्षा अफेयरमुळे अधिक चर्चेत राहिल्या. डॅन्नी डॅग्झोपासोबत  चार वर्षांची रिलेशनशिप आणि मग कबीर बेदीला त्यांनी डेट केले होते. यानंतर त्यांचे नाव महेश भट्टसोबत जोडले गेले. परवीन या स्क्रीझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त होत्या असा दावा करण्यात येतो. 22 जानेवारी 2005 रोजी त्या स्वत:च्या फ्लॅटवर मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. त्यावेळी त्या 55 वर्षांच्या होत्या.

Advertisement
Tags :

.