For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इफ’चा ट्रेलर प्रदर्शित

06:23 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘इफ’चा ट्रेलर प्रदर्शित
Advertisement

अमेरिकन फँटसी कॉमेडी चित्रपट ‘इफ’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रयान रेनॉल्ड्सची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत आकर्षक आहे. जॉन क्रान्सिस्की यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात जेव्हा मुले मोठी होतात आणि त्यांच्याविषयी विचार करणे बंद करतो तेव्हा काय घडते हे दाखविण्यात आले आहे. ए क्वाइट प्लेसचे दिग्दर्शक, डेडपूलचा स्टार आणि तुमच्यासाठी एनीहिलेशन आणणाऱ्या स्टुडिओची एक मनस्पर्शी, कौटुंबिक चित्रपटासाठी तयार रहा असे रेयानने म्हटले आहे. या चित्रपटाच्या जगतात काल्पनिक मित्र राहत असून त्यांना आयएफएस या नावाने ओळखले जात असल्याचे त्याने नमूद पेले आहे. या चित्रपटाची निर्मिती पॅरामाउंट पिक्चर्सकडून करण्यात आली आहे. इफ हा चित्रपट 17 मे रोजी प्रदर्शित केला जाईल. जॉन क्रान्सिस्की यांच्या या चित्रपटात रेयान रेनॉल्ड्स, स्टीव कॅरेल यांच्यासोबत कॅली फ्लेमिंग, फियोना शॉ, फोएबे वालर-ब्रिज, लुईस गॉसेट ज्युनियर, सेबेस्टियन

Advertisement

मॅनिसल्को, माया रुडोल्फ, जॉन स्टीवर्ट, बॉबी मोयनिहान, एमिली ब्लंट, मॅट डेमन, सॅम रॉकवेल, रिचर्ड जेनकिन्स आणि क्रिस्तोफर मेलोनी इत्यादी कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.